नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे सत्कार



नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे सत्कार 

येवला : पुढारी वृत्तसेवा

     डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी महाराष्ट्र बँकेच्या येवला शाखेत नियमित पिक कर्जफेड ही एक संस्कृती विकसित व्हावी तसेच शासनामार्फत व्याज सवलत योजना व प्रोत्साहनपर मोबदला यांची सर्वसामान्य शेतकरी यांना माहिती देण्यासाठी बँकेतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत नाशिक विभागाचे क्षेत्रिय व्यवस्थापक  एस. जे. पाटील यांच्या मार्गदर्शनातुन येवल्यातील पिककर्ज नियमित भरणार्यां शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सदरप्रसंगी शाखेचे व्यवस्थापक दिपक बारहाते , माजी व्यवस्थापक एच. एस . चव्हाण , मुंढे साहेब , बँकेचे अधिकारी हनुमंत वाघमोडे , मुकुंद थांगे , बाळासाहेब आमलै , विशाल नागरे , नंदकुमार शिंदे, गोल्ड लोन व्हॕल्युअर अमोल उदावंत व शेतकरी सुनील देशमुख , ग्राहक आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने