एम आय टी पॉलिटेक्निक येवला येथे कॅम्पस प्लेसमेंट मुलाखतीतून विविध कंपनी करिता 45 विद्यार्थ्यांची निवड.

एम आय टी पॉलिटेक्निक येवला येथे कॅम्पस प्लेसमेंट मुलाखतीतून विविध कंपनी करिता 45 विद्यार्थ्यांची निवड.

येवला  : पुढारी वृत्तसेवा

 मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील तृतीय वर्ष मेकॅनिकल तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांकरिता बजाज ऑटो, लुमॅक्स इंडस्ट्रीज, लुकास टीव्हीएस पुणे या नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनी करिता प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते.या मध्ये बजाज ऑटो करिता 9, लुमॅक्स  इंडस्ट्रीज करिता 10 तर टीव्हीएस लुकास करिता 26 विद्यार्थ्यांची निवड वैयक्तिक मुलाखत घेऊन गुणवत्तेच्या आधारवर करण्यात आली.सदर मुलाखतीला महाविद्यालयातील 100 हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सर्व कंपनीच्या प्रोडक्शन तसेच एच आर टीम द्वारे विद्यार्थ्यांचे लेखी परीक्षा व टेक्निकल मुलाखत फेरीमधून निवड करण्यात आली.
    मातोश्री तंत्रनिकेतन येथे ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी आपली मेहनत व गुणवत्तेच्या आधारे कंपनीमध्ये नावलौकिकता कमावतात त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या मातोश्री तंत्रनिकेतन येथे कॅम्पस मुलाखत घेण्याकरिता प्राधान्य देतात यावर्षी देखील अंतिम वर्षातील अनेक विद्यार्थ्यांना आपली शेवटच्या सत्रातील परीक्षा पूर्ण होण्याअगोदरच कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजवर ऑफर्स मिळालेले आहेत.
     निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना दोन ते अडीच लाखापर्यंत पॅकेज,राहण्याची, जेवण्याची व्यवस्था,इन्शुरन्स, मेडिक्लेम व इतर सुविधा कंपनीतर्फे देण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य गीतेश गुजराती यांनी दिली.
    बजाज ऑटो पुणे करिता एच आर व्यवस्थापक श्री संजय ढोबळे यांनी मुलाखत घेतल्या तर लुमॅक्स इंडस्ट्रीज पुणे करिता एच आर व्यवस्थापक वसिम काझी यांनी मुलाखत घेतल्या आणि लुकास टीव्हीएस पुणे एच आर व्यवस्थापक रीना हिवाळे यांनी मुलाखती घेत विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये कामकाज करायची पद्धत तसेच कंपनीमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांबद्दल माहिती दिली.
   महाविद्यालयाचे प्राचार्य गितेश गुजराती यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख नितीन गुजर,समन्वयक प्रा मयूर दिवाण प्रा हेमंत गायकवाड,मीनानाथ तीपायले,सुरज धनगे यांनी या कॅम्पस चे आयोजन केले.निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष किशोर दराडे,सचिव कुणाल दराडे प्राचार्य गीतेश गुजराती विभाग प्रमुख बाळासाहेब तांबे,योगेश खैरनार महेश घोरपडे,स्वप्नील जाधव,रवींद्र शिंदे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

"रोबोटिक्स तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करत ऑटोमोबाईल तसेच सर्व कंपन्या अद्यावत होत आहेत आम्ही महाविद्यालयात इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन सेल ची स्थापना करत विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासूनच विविध ट्रेनिंग तसेच कंपनी विजिट चे आयोजन करतो. त्यामुळेच अंतिम वर्षात विविध मल्टिनॅशनल कंपनी विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजची नोकरी प्लेसमेंटच्या माध्यमातून उपलब्ध करून देतात"
श्री रुपेश दराडे
संचालक,जगदंबा व मातोश्री शिक्षण संस्था

फोटो..निवड झालेल्या विद्यार्थ्यांसोबत संचालक रुपेश दराडे,प्राचार्य गीतेश गुजराथी व कंपनी प्रतिनिधी
थोडे नवीन जरा जुने