बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी


बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

येवला : पुढारी वृत्तसेवा

बार्टीच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्ति भूमी स्मारक येवला या ठिकाणी तथागत बुद्ध यांची २५६७वी जयंती अर्थात बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली
यावेळी स्थानिक प्रशासनाच्या वतीने व मुक्ती भूमी स्मारकाच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास येवला शहराचे एपीआय  मनोहर मोरे  यांच्या हस्ते पुष्पहार व पुष्प अर्पण करण्यात आले करण्यात आले.  यावेळी  त्रिसरण पंचशील घेण्यात आले. मुक्ती भूमी स्मारकाच्या व्यवस्थापिका तथा संशोधन अधिकारी श्रीमती पल्लवी पगारे यांनी दीपप्रज्वलन करून पुष्प अर्पण केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भगवान साबळे मर्चंट बँकेचे संचालक  सुभाष गांगुर्डे, एलसीबी विभागाचे पोलीस अधिकारी  देशमुख , पर्यवेक्षक सिद्धार्थ हिरे, होमगार्ड कर्मचारी, व सामाजिक क्षेत्रातील सचिन सोनवणे दीपक लोणारी, गोटू भाऊ मांजरे, सुमित थोरात त्याचप्रमाणे विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी स्मारकास भेट देऊन भगवान बुद्धांना वंदन केले दिवसभरामध्ये जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष श्रीमती मायाताई पगारे भागिनाथ पगारे, व येवला शहर चे पोलीस अधीक्षक  नंदकुमार कदम , चंद्रकांत  निर्मल . व मुक्ती भूमी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने