अनोळखी इसमांच्या खुनाचा येवला तालुका पोलीसांनी केला उलगडाअनोळखी इसमांच्या खुनाचा येवला तालुका पोलीसांनी केला उलगडा

येवला : पुढारी वृत्तसेवा

मागील महिन्यात झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा उलगडा येवला तालुका पोलिसांनी अवघ्या 21 दिवसात केला आहे , दि. २१/०४/२०२३ रोजी सकाळी ०८.०० वाजेच्या सुमारास निळखेडा शिवार ता. येवला जि. नाशिक येथील विजया शांताराम कदम यांचे शेतात बारदानामध्ये अर्धवट ठेवलेले प्रेत मिळून आल्याबाबत सोमठाणदेश चे 
गावकामगार पोलीस पाटील  सुनिल कदम यांनी येवला तालुका पोलीस स्टेशन खबर दिल्याने सदर खबरो वरुन अकस्मात मृत्यु व स्थानंतर गुरनं. २२०/२०२३ भादवि कलम ३०२, २०१ प्रमाणे दि. २३/०४/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाले नंतर उच्चत्तरीय अधिकाऱ्यांबरोबर मनमाड उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक समिरसिंह साळवे, यांनी केलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  पांडुरंग पवार यांचे येवला तालुका पोलीस स्टेशनकडील तपास पथक सहा. पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत, सहा. पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, सहा. पो.उप निरी. अल्ताफ शेख,  पो. हवा. माधव सानप, पोना राजेंद्र केदारे, पोना सचिन वैरागर, पोना ज्ञानेश्वर पल्हाळ,  पो.कॉ. आबा पिसाळ,  पो.कॉ. सागर बनकर, पो. कॉ. संतोष जाधव,  पोकॉ. संदीप दराडे, पोका, नितीन पानसरे यांनी गुन्ह्याचे घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करुन तसेच विहीरीवरील मजुर याचेकडेस कसून तपास करून व सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहीतीचे कसुन विश्लेषण करुन अनोळखी मयताबाबत तसेच अज्ञात आरोपीबाबत समांतर तपास करीत असतांना तपास पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीचे आधारे तपास पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपी नामे १) कृष्णा बाळु कोकाटे, वय ३६ वर्ष, रा. आंबेगांव ता. येवला जि. नाशिक व २) पांडुरंग गोविंदराव राठोड, वय ४१ वर्ष, रा. करंजगव्हाण ता. मालेगांव जि. नाशिक यांना गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेऊन त्यांना पोलीस खाक्या दाखविताच त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.

आरोपी कृष्णा बाळु कोकाटे व मयत राजु पुर्ण नांव माहीत नाही. रा. चांदुर जि. अमरावती असे कटींग करुन व दारु पिऊन लासलगांव येथून मोटार सायकलवर आंबेगांव येथे येत असतांना त्यांचा रस्त्यात अपघात झाला. अपघातात मयत राजु यास जखमा झाल्या होत्या. त्याकारणावरुन मयत राजु व आरोपी कृष्णा कोकाटे यांचेत भांडण झाले होते. त्यानंतर मयत राजु न आरोपी कृष्णा कोकाटे असे विहीरीवर येऊन अंघोळ केली. व पुन्हा त्यांचे भांडण झाले. तेव्हा आरोपी कृष्णा कोकाटे यांने मयत राजु याचा दोन्ही हाताने गळा आवळून जिवे ठार मारले. व त्यास विहीरीत ढकलुन दिले. व आरोपी नं. २ वास राजु विहीरीच्या पाण्यात बुडुन मयत झाला आहे. असे फोनवर कळविले होते. त्यानंतर आरोपी कृष्णा कोकाटे यांने इलेक्ट्रीक मोटार चालु करुन विहीरीचे पाणी काढुन मयत राजु यास दोर बांधुन बाहेर काढले. व आरोपी कृष्णा कोकाटे व पांडुरंग राठोड यांनी राजु याचे प्रेत मोटार सायकलवर टाकुन निळखेडा शिवारात आणुन टाकुन खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीकडुन मयताची ओळख पटविण्याचा प्रयत्न चालु असून आरोपीना पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे.
थोडे नवीन जरा जुने