शासकीय आयटीआयतर्फे येवल्यात मंगळवारी युवाशक्ती करिअर शिबिरशासकीय आयटीआयतर्फे येवल्यात मंगळवारी युवाशक्ती  करिअर शिबिर


येवला : पुढारी वृत्तसेवा
कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविण्यता विभाग महाराष्ट्र व येथील शासकीय आयटीआय यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर मंगळवारी (दि.२३) येथे होणार आहे.
येथील महात्मा फुले नाट्यगृहात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत आयोजित या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन शिबिर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.या शिबीरात दहावी-बारावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम,महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया, कलमापन चाचणी,शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना, करिअर प्रदर्शन, दहावी-बारावीनंतर काय ?, भविष्यातील रोजगाराच्या संधी, व्यक्तीमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी याबद्दल विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मागदर्शन लाभणार आहे. 
यासाठी संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन येथील आयटीआयचे प्राचार्य एस.पी.भदाणे व सदस्य सचिव,प्राचार्य आर.एस.राजपूत यांनी केले आहे.या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी आयटीआयचे गटनिदेशक सौ.एस.ए.धाकरांव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
थोडे नवीन जरा जुने