चेन्नईत ट्रायथलॉन नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करत येवल्याचा कृष्णा तनपुरेने पटकावले सुवर्णपदक




चेन्नईत ट्रायथलॉन नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करत येवल्याचा कृष्णा तनपुरेने पटकावले सुवर्णपदक 
 

येवला : पुढारी वृत्तसेवा


चेन्नई येथे झालेल्या पहिल्या ऑफिशियल ट्रायथलॉन नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत येथील कृष्णा तनपुरे याने सुवर्णपदक पटकावले आहे.कृष्णा भारतात झालेल्या पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेचा विजेता ठरला.
नुकतेच अबुधाबीत (दुबई) आडगाव रेपाळच्या कृष्णा तनपुरे या युवकाने स्वतःसोबतच भारताचे नाव रोषन केले आहे.या खेळात भारतासाठी पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा कृष्णा पहिला खेळाडू ठरला आहे.
अत्यंत गरीब परिस्थिती असतांना प्रतिकूल परिस्थितीवर मात करून थेट वर्ल्डकप स्पर्धा गाजविणाऱ्या कृष्णाने देशाची शान वाढवली आहे.सोबतच ट्रायथलॉनमध्ये चमकदार कामगिरी करून कास्यपदक आणि वय ग्रुप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवत कुटुंब व गावाचे नाव केले असून या खेळात तो भारतासाठी उदयोन्मुख खेळाडू म्हणून पुढे येत आहे.
आता नुकतीच चेन्नईला झालेल्या नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत त्याने महाराष्ट्राचे नेतृत्व करत सुवर्ण पदक पटकावले.स्पर्धमध्ये ३ खेळ  ३०० मीटर पोहणे,१० किमी सायकलिंग आणि २ किमी धावणे असे आंतर होते.ते अंतर अवघ्या ३३:५६ मिनिटामध्ये पूर्ण करत त्याने नवा विक्रमही केला असून देशाचा पहिला चॅम्पियन ठरला आहे.तो सध्याच्या वयोगटातील वर्ल्ड चॅम्पियन देखील आहे.या यशाबद्दल त्याचे तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. दरम्यान ८ व ९ जूनला उजबेकिस्तान येथे होणाऱ्या आशियाई चषक स्पर्धेसाठी त्याची भारताकडून निवड झाली आहे. कृष्णा सध्या या स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहे.
थोडे नवीन जरा जुने