हिंदुसुर्य महाराणा प्रताप यांना अभिवादन येवल्यात धडपड मंचच्या वतीने जयंती निमित्त आकर्षक सजावटहिंदुसुर्य महाराणा प्रताप यांना अभिवादन येवल्यात धडपड मंचच्या वतीने जयंती निमित्त आकर्षक सजावट

येवला : पुढारी वृत्तसेवा
 हिंदुसुर्य महाराणा प्रताप यांचे जयंती निमित्त येथील स्वयंसेवी संस्था धडपड मंचच्या वतीने आयोजीत कार्यक्रम प्रसंगी येवल्याचे मा.नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात येवुन उपस्थितांनी अभिवादन केले.  याप्रसंगी किशोर सोनवणे, नारायण शिंदे, प्रा.दत्ता नागडेकर, आबासाहेब सुकासे, पंकज सांबर, श्रीकांत खंदारे, अमर छतानी, शिवाजी जाधव, गोटीराम कोटमे, रमाकांत खंदारे, अनिल हलवाई, आदी उपस्थित होते.  उपस्थितांचे धडपड मंचचे अध्यक्ष प्रभाकर झळके यांनी स्वागत करुन आभार व्यक्त केले.   

यावेळी शहरातील खांबेकर खुंट परिसरात महाराणा प्रताप सिंह यांच्या भव्य प्रतिमेभोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती.  तसेच परिसरात भगवे ध्वज लावुन परिसर सुशोभीत करण्यांत आला होता.  महाराणा प्रताप सिंह यांची भव्य प्रतिमा व सजावट सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते. प्रभाकर झळके हे धडपड मंचच्या माध्यातुन वर्षभर आगळे वेगळे तसेच सामाजीक उपक्रम राबवित असुन त्यामुळे येवल्यातील उत्सवांचा सांस्कृतिक वारसा त्यांनी जपला असल्याने त्यांचे कौतुक श्री.लोणारी यांनी यावेळी केले.  वीरता, हुशारी आणि धाडसासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराणा प्रताप यांचे नाव इतिहासाच्या पानांवर कोरले गेले असल्याचे श्री.झळके यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

याप्रसंगी मयूर पारवे, दत्ता कोटमे, दिपक कासले, गोपी दाणी, मुकेश लचके, शुभम सुकासे आदींनी परिश्रम घेतले.
थोडे नवीन जरा जुने