जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धा – येवला महिला संघ विजेता

जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धा – येवला महिला संघ विजेता

येवला  : पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात खासदार चषक या खेळ महोत्सवाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सौ. भारतीताई पवार यांच्या वतीने चांदवड जि. नाशिक येथे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेमध्ये रस्सीखेच या स्पर्धा प्रकारात दि स्टडी सर्कल फाऊंडेशन पोलीस आर्मी अकॅडमी, येवला  या महिला संघाने प्रथम क्रमांक मिळवला.
या संघामध्ये  कोमल कांबळे, शिवानी उंडे, साक्षी निकम, शालीनी शेळके, प्रतिक्षा शेळके, मोनाली जाधव, अश्विनी मढवई, रेश्मा शेख, गायत्री भोसले, छाया मोरे यांचा समावेश होता . या प्रसंगी मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध नायक मकरंद अनासपुरे व केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. सौ. भारतीताई पवार यांच्या हस्ते  विजेत्या महिला खेळाडूंना बक्षीस देण्यात आले.
या खेळाडूंना संस्थेचे प्रशिक्षक हरेश बनसोडे, संचालक शैलेंद्र पंडोरे, नवनाथ उंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
थोडे नवीन जरा जुने