आमदार दराडेच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगाना मोफत वॉकर,स्टिकचे वाटप

आमदार दराडेच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगाना मोफत वॉकर,स्टिकचे वाटप


येवला : पुढारी वृत्तसेवा

येथील दराडे कुटुंबीय नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आले असून आमदार किशोर दराडे तसेच युवा नेते संकेत दराडे यांच्या वाढदिवसानिमित्त ५० वर गरीब व गरजू दिव्यांग व्यक्तींना मोफत वॉकर व वॉकिंग स्टिकचे वाटप करण्यात आले.
बाभुळगाव येथे जगदंबा शिक्षण संस्थेच्या आवारात भव्य मातोश्री आयुर्वेद हाॅस्पिटल कार्यान्वित केले आहे.या ठिकाणी अवघ्या आठ ते बारा हजारात महिलांची प्रसूती तसेच अतिशय अल्प दरात इतर आजारांवरही उपचार केले जातात. हजारो गोरगरीब या सुविधेचा लाभ घेत आहेत.विशेष म्हणजे मागील वर्षी वाढदिवसानिमित्त मुंबई, नाशिक,पुण्यातील नामांकित हॉस्पिटलच्या विद्यमाने धानोरे येथे भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिर घेण्यात आले होते.यावेळी तर १० हजारावर अधिक रुग्णांची तपासणीही व काहींवर उपचार झाले होते.यावर्षी देखील सामाजिक बांधिलकी बाळगत हा उपक्रम कायम ठेवण्यात आला आहे.
येथील मातोश्री हॉस्पिटलच्या प्रांगणात विविध प्रकारच्या दिव्यांगांना हे साहित्य युवा नेते संकेत दराडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे संतोष जनसेवा मित्र मंडळाच्या माध्यमातून गेल्या 30-35 वर्षापासून तालुकावाशीयांची सेवा करत आहेत।या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रमही राबविले व मदतीचा हातही दिला आहे.आता युवा नेते कुणाल दराडे हे कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून शहर व तालुक्यात अनेक उपक्रम राबवून गोरगरिबांना मदतीचा हात देत आहे.दराडे परिवार सामाजिकता जोपासण्याचा हा उपक्रम अखंडपणे सुरू ठेवणार असल्याचे यावेळी संकेत दराडे म्हणाले.
कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य गोरख येवले व फार्मसीचे विभागप्रमुख प्रा.डॉ.पवन आव्हाड,प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे,सहअधिकारी सुनिल पवार यांनी केले.
याप्रसंगी फार्मसीचे उपप्राचार्य प्रा. डॉ.अमोल गायके,प्रदिप पाटील,विठ्ठल परदेशी,दत्तात्रेय खोकले,रावसाहेब मोहन,प्रा.राहुल भाबड आदी उपस्थित होते.
फोटो
बाभूळगाव : दिव्यांगांना व्हील चर्चा वाटपाप्रसंगी संकेत दराडे तसेच डॉक्टर व प्राध्यापक
थोडे नवीन जरा जुने