ई-पीक पाहणी नोंदविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी येवला चे तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर




ई-पीक पाहणी नोंदविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी येवला  चे तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर

येवला : पुढारी वृत्तसेवा

शेतकऱ्यांना सातबारावर पिकाची अचूक माहिती भरण्यासाठी राज्य सरकारने ई-पीक पाहणी ॲप सुरू केले आहे. महसूल विभागातर्फे  हा उपक्रम राबविला जात आहे. माझी शेती माझा सातबारा, माझा पिक पेरा यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. येवला तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये ई-पीक पाहणी ॲपला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

येवला चे तहसीलदार  आबा महाजन स्वतः येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी नोंदविण्याचे प्रशिक्षण देत असून त्यांच्या अधिनस्त असणारी संपूर्ण यंत्रणा दैनंदिन विविध शेतातील बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. शेतकऱ्यांना खरीप पिकाचा पिक पेरा भरण्यासाठी मोबाईलद्वारे ई पिक पहाणी अँप वर खरीप पिका चा पेरा भरण्याची सुविधा देण्यात आली असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन तहसील दार आबा महाजन यांनी केले आहे. या अँप मुळे आता शेतकऱ्यांना तलाठ्या कडे जाण्याची गरज राहणार नाही येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पीक पेरा भरण्याचे मार्गदर्शन तहसीलदार श्री आबा महाजन यांनी शेतकऱ्यांना केले यावेळी या कार्यक्रमाला    संदीप काकड मंडळ अधिकारी अंदसुल ,    आकाश कदम तलाठी डोंगरगाव  परेश धर्माळे तलाठी देवठाण, श्रीमती रीमा भागवत तलाठी बोकटे , विशाल पाटील तलाठी तळवाडे व अंदरसूल परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने