स्वामी मुक्तानंद शाळेत शौचालय ची अवस्था बिकट

स्वामी मुक्तानंद शाळेत शौचालय ची अवस्था बिकट

येवला  : पुढारी वृत्तसेवा


येवल्यातील अतिशय प्रसिद्ध असलेल्या स्वामी मुक्तानंद विद्यालय या शाळेमध्ये मुलांना शौचालय जाण्यासाठी शौचालयाची व्यवस्था नसल्याने आरोग्य धोक्यात येत आहे .  मुला मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात  यावे व शाळेमधील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावे व शाळेमध्ये स्वच्छता ठेवण्यात यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने निवेदन स्वामी मुक्तानंद शाळेचे  प्राचार्य पैठणकर यांना दिले. 

सुमारे आजार 2000 विद्यार्थी असलेल्या या शैक्षणिक संकुलामध्ये पिण्याच्या पाण्यापासून शौचालयाची दुरवस्था झाली आहे. शौचालयास शाळेच्या परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण असून असलेले शौचालय तुंबलेल्या आणि फुटलेल्या अवस्थेत आहे तर या ठिकाणी सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचाही मोठ्या प्रमाणात संचार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


 यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष महेश लासुरे ,जिल्हा उपाध्यक्ष सागर शेळके, जिल्हा सचिव आकाश ठोंबरे, जिल्हा सहसचिव गोरख घोडके, तालुकाध्यक्ष प्रवीण खैरनार ,शहरअध्यक्ष लखन शिंदे, तालुका सचिव आकाश गायकवाड, शहर उपाध्यक्ष अक्षय पंडोरे, तालुका संघटक निलेश सातारकर ,तालुका उपाध्यक्ष रामा जांभळे, संजय सोमासे,  विशाल सूर्यवंशी ,जालिंदर पवार ,चेतन गायकवाड व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने