महादेवाच्या मंदिरात चक्क नागाचे दर्शन..... इंडियन कोब्रा जातीचा नाग



महादेवाच्या मंदिरात चक्क नागाचे दर्शन..... इंडियन कोब्रा जातीचा नाग 

येवला : पुढारी वृत्तसेवा

येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये नागदेवाने दर्शन दिल्याची घटना शुक्रवार दि 11 रोजी घडली . दुपारच्या सुमारास वडगाव येथील संदीप शिंदे हे दर्शनासाठी आले.असता त्यांना मंदिर गाभाऱ्यात नाग दिसताच त्यांनी त्वरित स्थानिकांना सांगितले. यावेळी सर्पमित्र दीपक सोनवणे यांना त्वरित मंदिरात बोलवण्यात आले. या सर्पमित्राने मोठ्या शिताफीने नागास मंदिराच्या गाभाऱ्यातून   ताब्यात घेतले , सदर नाग वन हद्दीत   सोडून देण्यात आला. इंडियन कोब्रा जातीचा नाग असून जवळपास चार ते साडेचार फूट लांबीचा सर्प असल्याची माहिती सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी दिली आहे.

या मंदिरात सतत नागराज महादेवाच्या मूर्ती जवळ येत असतात तर या मंदिरात प्रत्येक प्रदोष ला रात्रीच्या वेळेस जत्रेचे स्वरूप असून तीन ते चार हजार भक्तगण येथे महाप्रसादाचा लाभ घेत असतात. या मंदिरामुळे स्मशानात येण्याची आणि स्मशानाविषयी असलेली भीती गायब झाली असून भोले शंकर महादेवाच्या दर्शनाने अनेक भाविक आपली दिवसाची सुरुवात करीत असतात. सोमवार प्रदोष अमावस्येच्या दिवशी भल्या पाटील येथे शिवपूजन साठी गर्दी होत असते.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने