येवला तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्था 6.5% लाभांश देणार! सर्वसाधारण सभेत झाला निर्णय

येवला तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्था 6.5% लाभांश
देणार!
सर्वसाधारण सभेत झाला निर्णय

येवला :-  पुढारी वृत्तसेवा

येवला तालुका माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित येवला या पतसंस्थेची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे चेअरमन श्री वाल्मीक नागरे सर यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय सुंदर अशा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सदर वार्षिक सभा स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला येथे आयोजित करण्यात आली होती. सदर सभेत सभासदांच्या मागणीनुसार 6.5% लाभांश देण्याचे सर्वांनुमते ठरले. 
वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात सेवानिवृत्त सन्माननीय सभासद व संचालक मंडळाच्या हस्ते  सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. अहवाल काळात संस्थेचे सभासद, माजी सभासद, ठेवीदार, हितचिंतक तसेच विविध क्षेत्रातील दिवंगत झालेले मान्यवर, शहीद जवान यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. अहवाल वर्षात सेवानिवृत्त झालेले मान्यवर सभासद यांचा यावेळी शाल-श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच नवनियुक्त प्राचार्य, उपप्राचार्य, संघटना पदाधिकारी यांचाही यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यवाह शिवाजी साताळकर सर, संचालक सुकदेव आहेर सर यांनी अहवाल वाचन केले. यावेळी सभासद कल्याण निधी, सभासद वर्गणी वाढवू नये अशी मागणी करण्यात आली. त्यावर चर्चा करून वाढ न करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. संचालक मंडळांनी लाभांश वाटप ६ टक्क्यांनी करण्याचे ठरवले होते मात्र सभासदांच्या मागणीनुसार सदर लाभांश वाटपात वाढ करून ६.५ टक्क्यांनी लाभांश वाटप करण्याचे ठरविण्यात आले. शिक्षक सभासद बंधू-भगिनी यांच्या विश्वासावर पतसंस्थेची वाटचाल सुरु असून पारदर्शी व्यवहार हाच खरा सभासदांच्या  विश्वासाचा कणा असल्याचे प्रतिपादन चेअरमन वाल्मिक नागरे सर, व्हा.चेअरमन विजय आरणे सर यांनी केले. पतसंस्था स्थापनेपासून सभासद असलेले मार्गार्दशक श्री. एम. पी. गायकवाड सर यांनी पतसंस्थेची स्थापनेपासूनची वाटचाल विषद करत अनुभव सांगितले व संस्थेच्या विद्यमान कामाकाजाबद्दल यावेळी बोलताना समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन सुकदेव आहेर सर व प्रदीप पाटील सर यांनी केले. चेअरमन वाल्मिक नागरे सर यांनी अध्यक्षीय भाषण करून आभार मानले. 
याप्रसंगी सभासद अनिलदादा सांळुके, आप्पासाहेब जमधडे, उत्तम साबळे सर, अविनाश कुलकर्णी, बाळासाहेब हिरे, मुख्याध्यापक मगन वारुळे, सुधिर चेमटे, विनोद सोनवणे, विज्ञान अध्यापक संघाचे रविंद्र थळकर, शैलेंद्र वाघ सर, विश्वास जाधव, भीमराज मुंगसे, गणेश फुलारे, ताराचंद पवार, वसंत बेंद्रे, अरुण थोरात, दिलीपसिंग गिरासे, वसंत धात्रक, कैलास देसले, रामकिसन बटवल, राजेंद्र दराडे,बबन बोराडे तसेच संस्थेचे  चेअरमन वाल्मीक नागरे, व्हा.चेअरमन विजय आरणे , कार्यवाह शिवाजी साताळकर आणि संचालक कानिफनाथ मढवई, संजय डोंगरे, तुकाराम लहरे, राजेंद्र नागरे, महेश जगदाळे, नानासाहेब लहरे, अरविंद जोरी, अनिल गावकर, सविता सौंदाणे, शैला गवळी, सचिव प्रशांत थोरात आदींसह माजी संचालक, माजी प्राचार्य तसेच सर्व सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने