मंत्री छगन भुजबळ यांनी पुरणगाव येथील मुन्ना शेख यांच्याकडील श्री गणेशाचे घेतले दर्शन

मंत्री छगन भुजबळ यांनी पुरणगाव येथील मुन्ना शेख यांच्याकडील श्री गणेशाचे घेतले दर्शन


मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून मुन्ना शेख व त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक


मुन्ना शेख यांच्याकडील गणेश उत्सवातून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन - मंत्री छगन भुजबळ


येवला  :- पुढारी वृत्तसेवा

 राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गणेशोत्सवानिमित्त पुरणगाव येथील मुन्ना शेख यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी शेख यांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणेशाचे पूजन करत दर्शन घेतले. यावेळी कुटुंबीयांशी संवाद साधून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.


यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गणेश उत्सवाच्या माध्यमातून मुन्ना शेख यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम जोपासली आहे. त्यांचं व त्यांचं कुटुंबाच हे सामाजिक ऐक्याचे काम अतिशय कौतुकास्पद आहे. यापुढील काळातही त्यांचं हे काम सुरू राहील असे सांगत त्यांना या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.


यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे,प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे,प्रा.ज्ञानेश्वर दराडे यांच्यासह शेख कुटुंबातील सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने