राष्ट्रवादी काँग्रेस कडून येवला तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
येवला : पुढारी वृत्तसेवा
तालुक्या उत्तर पूर्व भाग असेल व पश्चिम भाग सर्व तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून मका बाजरी मूग सोयाबीन कपाशी आधी पिके जळून गेली आहेत.
शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील आता गंभीर होत असून बळीराजा आता मेटाकोटीला आलेला आहे.
त्याचबरोबर टोमॅटो व कांद्याचे घसरलेले दर आणि शासनाने 350 रुपयाचे अनुदान जाहीर केले होते ते अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नसून ते त्वरित जमा करावे आणि येवला तालुक्यात रखडलेला पुणे गाव दरसवाडी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा या मागणीचा निवेदन
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट येवला लासलगाव विधानसभा अध्यक्ष सुभाष निकम यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांना देण्यात आले,
याप्रसंगी विठ्ठलअण्णा शेलार, सिताराम पैठणकर कारभारी अभंग शंकर घाडगे जयराम पैठणकर, बळवंत थोरात भाऊलाल कुडके, आदी पदाधिकारी उपस्थित होते.