बल्हेगावी सर्व समाज बांधवांनी केला जालना येथील लाठीचार्जचा निषेध


बल्हेगावी सर्व समाज बांधवांनी केला जालना येथील लाठीचार्जचा निषेध

 येवला  : पुढारी वृत्तसेवा

येवला तालुक्यातील बल्हेगाव येथील सर्व गावकरी व समाज बांधवांनी एकत्र येत जालना येथील मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जचा तिव्र निषेध केला आहे. येथील मारुती मंदिर येथे हा निषेध करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवेली सरवटी या गावी मराठा समाजातील आंदोलनकर्ते संविधानिक मार्गाने आरक्षणासाठी आंदोलन करीत असतांना पोलिसांनी हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला व निरपराध नागरिकांवर लाठीमार केला.यात मोठ्या प्रमाणात महिला आंदोलक जखमी झाल्या आहेत.या कृतिचा विरोध करीत बल्हेगाव येथे सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन सरकारचा निषेध केला आहे. यावेळी मेनबत्त्या प्रज्वलीत करण्यात आल्या. मराठा समाज हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे. या समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे. शैक्षणिक व सामाजिक आरक्षण मिळाल्यास मराठा समाजातील लोकांना न्याय मिळणार आहे, परंतु आजपर्यंत या समाजाचा राज्यकर्ते वापर करून आपली पोळी भाजत असल्याचा आरोप नितीन संसारे यांनी केला. नानासाहेब पिंगळे यांनी सर्वच समाजबांधवांनी मतभेद विसरून मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला पाहिजे, व संविधानिक मार्गाने हे आंदोलन यशस्वी केले पाहिजे, संविधानात तरतूद असतांना आरक्षण नाकारले जात आहे तरी सर्वसमावेशक आंदोलन उभे केले पाहिजे असे आवाहन केले. या प्रसंगी विकास पानपाटील, बाळासाहेब वाल्हेकर, भिमराव डोळस,ऋतिक डोळस आदींनी आपले मतप्रदर्शन केले. दत्ता जमधडे, ग्रामपंचायत सदस्य शंकर निकाळे,गोरख जमधडे, समाधान सोमासे, ज्ञानेश्वर सोमासे,मुनीर शेख,विलास पिंगळे, बाळासाहेब वाणी, सिध्दांत संसारे, सिताराम पि़ंगळे, आमिण पठाण, दत्तु जमधडे,ज्ञानेश्वर जमधडे, सोमनाथ बोरणारे, सोमनाथ पगार, गंगाधर मोरे, संतोष जमधडे, भाऊसाहेब पिंगळे, भाऊसाहेब सोमासे, निखिल संसारे,दत्तु गरुड आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महापुरुषांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या. व सरकारचा तिव्र निषेध करण्यात आला. यावेळी सामाजिक एकतेचे सर्वसमावेशक चित्र पाहायला मिळाले.
थोडे नवीन जरा जुने