डोंगरगावला बाजार समितीच्या वतीने सोयाबीन,मका लिलावाचा शुभारंभ
डोंगरगावला बाजार समितीच्या वतीने
सोयाबीन,मका लिलावाचा शुभारंभ
पहिल्याच दिवशी ९० ट्रॅक्टर व रिक्षातून २ हजार क्विंटल शेतमाल विक्रीला


येवला : पुढारी वृत्तसेवा
पूर्व भागातील शेतकरी हितासाठी व शेतमाल विक्रीची सुविधा उपलब्ध करण्यासाठी येथील कृषि उत्पन्न बाजार समिती अंतर्गत डोंगरगांव येथे मका,सोयाबीन व भुसारधान्य या शेतीमालाच्या खरेदीचा शुभारंभ आज मंगळवारी करण्यात आला.
या भागातील शेतकरी अनेक वर्षांपासून बाजार समितीने उपआवार सूरु करावे अशी मागणी करत होते.त्याची दखल घेऊन येथे खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आज
मजुर संघाचे माजी अध्यक्ष संभाजी पवार, बाजार समितीचे सभापती किसनराव धनगे, भुजबळ यांचे स्विय सहाय्यक  बाळासाहेब लोखंडे यांच्या हस्ते नारळ वाढवून खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.दोन्ही सत्रात खरेदी विक्री केंद्रावर ९० ट्रॅक्टर व रिक्षा या वाहनातून अंदाजे २ हजार क्विंटल मका तसेच गहु, बाजरी, मुग व सोयाबीन इत्यादी शेतीमाल विक्रीस आलेला होता.सर्वप्रथम शेतकरी  संजय सोमवंशी (रा.डोंगरगांव) यांचा टोपी व उपरणे देवून सत्कार करण्यात आला.त्यांनी विक्रीस आणलेल्या मकास ४ हजार ५०० प्रति क्विंटल इतका उच्च बाजारभाव मिळाला. मकाचे बाजारभाव किमान १८५० रुपये ते कमाल २२११ रुपये तर सरासरी २१७० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते.सोयाबीनचे बाजारभाव किमान ४ हजार २११ ते कमाल ४५७१ रुपये तर सरासरी ४५११ रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तर गहु २२०० रुपये, बाजरी २२०० रुपये व मुग ६४१० रुपये पर्यंत विक्री झालेला आहे.
डोंगरगांव येथील खरेदी विक्री केंद्रावर मका व भुसारधान्य लिलाव सुरु झाल्यामुळे डोंगरगांवसह भारम परिसरातील शेतक-यांची जवळच्या ठिकाणी विक्रीची चांगली सोय झाली असून येथे कांदा खरेदीस या केंद्राचा विस्तार आहे बाजार समिती मार्फत करण्यात येईल असे मनोगत ज्येष्ठ संचालक वसंतराव पवार यांनी व्यक्त केले.
शेतीमालाचे रोख पेमेंट मिळणार असुन शिवार व खेडा खरेदीतुन होणारी वजनातील फसवणुक टाळली जाणार आहे. डोंगरगांव खरेदी विक्री कें द्रावर आठवडयातुन सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस लिलाव चालु राहणार असल्याने डोंगरगांवसह भारम परिसरातील शेतकरी बांधवांनी आपला मका,सोयाबीन व इतर भुसारधान्य शेतीमाल वाळवुन व स्वच्छ करुन विक्रीस आणावे तसेच चांगले बाजारभाव मिळणेसाठी आपला शेतीमाल खरेदी विक्री केंद्रावरच विक्री करावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती किसन धनगे, उपसभापती ऍड. बापुसाहेब गायकवाड व सचिव  के. आर. व्यापारे यांनी केले आहे.
यावेळी बाजार समितीचे संचालक संजय बनकर,वसंतराव पवार,महेश काळे, सचिन आहेर,रतन बोरनारे,कांतीलाल साळवे,भास्कर कोंढरे,अल्केश कासलीवाल,संजय पगार,  नंदकिशोर आट्टल,भरतशेठ समदडीया, संचालिका सविता पवार,संध्या पगारे, अर्जुन ढमाले,नितीन गायकवाड,ज्ञानेश्वर दराडे, दिपक लोणारी,सरपंच शारदा सोमासे,भारमच्या सरपंच योगेश व्यवहारे,दत्तात्रय सोमासे,बाळासाहेब दाणे, नंदुआबा सोमासे, उत्तम सोमासे, भागीनाथ पगारे, बाबुराव सोमासे,मछिंद्र थोरात,श्रावण देवरे तसेच व्यापारी साहेबराव नळे,शांताराम पगारे, योगेश सोमासे, संतोष पांडे, सुनिल पांडे, राजेंद्र होळीवाले, जगनराव सोमासे, साईनाथ ढोकळे, रवि व्यवहारे, बापु गांजे, संतु पांडे त्याचप्रमाणे बाजार समितीचे सचिव के. आर. व्यापारे, सिध्देश्वर जाधव,सुरेश चौरे, दिलीप आरखडे, सुनिल साताळे, दत्तु टोंगारे आदी उपस्थित होते.

"बाजार समितीने नेहमीच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. अंदरसुल व पाटोदा येथील उपबाजार यशस्वीपणे सुरू असून आता डोंगरगाव येथील खरेदी केंद्रामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची शेतमाल विक्रीची जवळ सोय झाली आहे. येथील केंद्राला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद द्यावा.भविष्यात अधिकाधिक सुविधा येथे उपलब्ध होतील."
-संभाजी पवार,माजी सभापती,प.स.,येवला

फोटो - 
डोंगरगाव : येथे भुसार धान्य खरेदीचा शुभारंभ करतांना सभापती किसनराव धनगे,संभाजी पवार,बाळासाहेब लोखंडे आदी.

   
   


थोडे नवीन जरा जुने