भुरटे विक्रत्यांकडून नायलॉन मांजाची लपवाछपवी करून विक्री


भुरटे विक्रत्यांकडून नायलॉन मांजाची लपवाछपवी करून विक्री
येवल्यात विक्रीवर निर्बंध घालून कारवाईची सर्व पक्षीयांची मागणी


येवला :पुढारी वृत्तसेवा

 येथील मकर संक्रातीचा पतंग उत्सव देशभर प्रसिद्ध आहे याचा गैरफायदा घेत काही भोरटे विक्रेते लपवाछपवी करून बंदी असतानाही नायलॉन मांजाची विक्री करत आहे वास्तविक नायलॉन म्हणजे दरवर्षीच अनेक जण जखमी होतात पशुपक्ष्यांना तर आपला जीवही गमावा लागण्याच्या घटना घडल्या आहेत.जीवघेणा असलेला हा मांजा विक्री व वापरावर त्वरीत बंदी आणावी व विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शहर सर्वपक्षीय कृती समितीने केली आहे.
आज शहर पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांना सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन ही मागणी केली आहे.यावेळी रिपाइंचे गुड्डू जावळे,शिवसेनेचे अतुल घटे,भाजपचे समीर समदडीया,रितेश बुब,राष्ट्रवादीचे योगेश सोनवणे,संजय कुक्कर,सचिन सोनवणे,राहुल लोणारी,मंगल परदेशी,मनोज दिवटे,धीरज परदेशी,महेश लासुरे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,शहरात मकर संक्रांत पतंगोत्सव जल्लोषात साजरा होत असून त्यासाठी लगबग सुरु आहे.मात्र गेल्या काही वर्षांपासून बाजारात नायलॉन मांजा विक्रीस येत होता.मात्र नायलॉन मांजामुळे होत असलेल्या दुर्घटनांमुळे त्यावर बंदी आणली गेली; परंतू नायलॉन (चायनीज) मांजावर बंदी असतांनाही शहरात या मांजाची विक्री सर्रासपणे चालु आहे.समाजबांधव एकोप्याने अतिशय उत्साहाने मकर संक्रांत साजरी करतात परंतू तरूणाईसह शौकिनांकडून पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जातो.नायलॉन मांजा एखाद्या शस्त्रासारखा धारधार असतो. हा मांजा अटकून अनेकांचा नाक, कान, गाल, गळा कापला गेलेला आहे. तसेच दरवर्षी मांजा अडकून पडल्याने दुचाकी चालकांचे अपघात होता व गळा कापला गेल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी होवून जीव गमवावा लागला आहे.पशुपक्षांचीही मांजामुळे जीवीताची हानी होते.अशा घटनांमुळे उत्सवाची लोकप्रियता देखील कमी होत आहे.  यामुळे पारंपारिक पध्दतीने बनविण्यात येणाऱ्या मांजाची कला नामशेष होत चालली आहे.नायलॉन मांजाला तरूण मुलांची व शौकिणांची चांगली पसंती असल्याने ते वाटेल ती किंमत देण्यास तयार आहे.याचमुळे चारपैसे कमविण्यासाठी आशेने काही दुकानदार,भुरटे विक्रते नायलॉन मांजावर बंदी असतांनाही लपवाछपवी करून नायलॉन मांजाची सर्रास विक्री करत आहे.अशा पध्दतीने बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर व खरेदी करणाऱ्यांवर कडक कायदेशीर व फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. 

"शहराचा पतंगोत्सव राज्यभर प्रसिद्ध असल्याने पतंग,दोरा,आसारी याची मोठी क्रेझ असते.हा उत्साह पाहूनच शासनाने बंदी घातलेला मांजा लपून-छपून मोठ्या प्रमाणात विक्री होतो.हा मांजा जीवघेणा असल्याने यापूर्वी गळा,कान,नाक कापण्याच्या व पक्षांच्या मृत्यूच्या घटनाही घडल्या आहेत.त्यामुळे तरुणांनी देखील इतरांच्या जीवाचा विचार करून हा मांजा वापरू नये.शहरात विक्रीवरही बंदी आणावी."
-समीर समदडिया,जिल्हा उपाध्यक्ष,भाजपा

फोटो
येवला : नायलॉन मांजा विक्रीवर बंदी आणण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांना देताना सर्व पक्षीय पदाधिकारी.


 
थोडे नवीन जरा जुने