मेजर नारायण मढवई यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ६७ पिशव्यांचे रक्त संकलन, विधायक उपक्रमातून वाहिली आदरांजली

मेजर नारायण मढवई यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ६७ पिशव्यांचे रक्त संकलन,
विधायक उपक्रमातून वाहिली आदरांजली
---
 येवला  : पुढारी वृत्तसेवा

चिचोंडी बुद्रुक येथील शहीद मेजर नारायण मढवई यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मारक स्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. देशसेवेची प्रचंड आवड असलेले नारायण मढवई यांना दोन वर्षांपूर्वी १० फेब्रुवारी २०२२ रोजी वीरमरण आले. त्यांची देशाबद्दल असलेली तळमळ आजही तरुणांना प्रोत्साहन देत आहे. त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त येथील साने गुरुजी ग्रामविकास मंडळ व साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मढवई वस्ती येथे स्मारकासमोर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६७ पिशव्यांचे रक्त संकलन झाले. नाशिक येथील लाईफ लाईन रक्त संकलन केंद्र यांच्या वतीने सपना नवले यांनी काम पाहिले. 
     यावेळी वीरपिता निवृत्ती मढवई, वीरमाता ताराबाई मढवई, वीरपत्नी सोनाली मढवई, चुलते साहेबराव मढवई, सोपान मढवई यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिबिरात सुरुवात करण्यात आली. यावेळी बाळासाहेब मढवई, सुशील शिंदे, गहिनीनाथ मढवई, सोमोदय मढवई, सेवानिवृत्त सैनिक अरुण कोकाटे, शंकर मढवई, विलास निमसे, आदित्य बोरणारे, किरण निमसे, प्रमोद पाटील, गोरखनाथ खराटे, रिजवान शहा, प्रदीप पाटील, गोरख मढवई, नारायण खराटे, बापूराव बावके, सागर रंधे, औदुंबर मढवई, बापूसाहेब खटाणे, बाळासाहेब काळे, धर्मा कुटे, किरण काळे, मच्छिंद्र शेळके, अक्षय काळे, नंदू घोटेकर, अशोक बोराडे, गौरव कुटे, भगवान चव्हाण, कृष्णा जगताप, सतीश सूर्यवंशी, जगदीश चौधरी, संपत बोरणारे, अनिल सूर्यवंशी, कैलास लुंगसे, सोन्याबापू मढवई, विजय निकम, विजय जावळे, प्रतीक खराटे, सर्जेराव सोनवणे, भाऊसाहेब शिंदे, राधु शिरसाठ, सतीश मढवई, प्रवीण राजगुरू, अमोल पैठणकर, दीपक खोंड, प्रांजल मढवई, अनिल शिंदे, योगेश पवार, धनंजय मढवई, प्रमोद घोटेकर, सुखदेव मढवई, किशोर पवार, शैलेश पवार, कुणाल पवार, प्रमोद देवडे, दिगंबर गायकवाड, किरण पाचपुते, रावसाहेब खराटे, संजय व्यवहारे, भाऊसाहेब मढवई, समीर देशमुख, शिला बोरणारे, नरेंद्र मढवई, समाधान सूर्यवंशी, नवनाथ लभडे, गणेश पवार आदींनी रक्तदान करून सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबासाहेब शिंदे, बाळासाहेब मढवई, धनजंय मढवई, श्रीराम मढवई, हरिष मढवई, कृष्णा 
मढवई यांनी परिश्रम घेतले. रक्तदान करणाऱ्यांना मढवई परिवाराच्या वतीने साईबाबांची मूर्ती सप्रेम भेट देण्यात आली.
----
चिचोंडी बुद्रुक: येथील शहीद मेजर नारायण मढवई यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिरात रक्तदान करताना रक्तदाते.
थोडे नवीन जरा जुने