येवला शहरात जनावरांची अवैध वाहतूक करणा-या गुन्हेगारांना येवला शहर पोलीसांनी ठोकल्या बेडया.

येवला शहरात जनावरांची अवैध वाहतूक करणा-या गुन्हेगारांना येवला शहर पोलीसांनी ठोकल्या बेडया.


येवला : पुढारी वृत्तसेवा

दि. २६/०३/२०२४ रोजी पहाटे ०५/३० वा चे सुमारास येवला कोपरगांव रोडवर मोरनी पैठणी समोर नांदेसर रेल्वे गेट जवळ, टाटा कपंनीचा एसई पिकप क्रमांक एमएच १५ डी के ४६२९ यामध्ये अवैधरित्या जनावरांची वाहतूक होत असले बाबतची माहिती डायल ११२ ला मिळाल्याने तात्काळ वरील ठिकाणी पोउनि/लोखंडे, पोना/५७९ गेटे, पोशि/४८२ दळवी, असे पोहोचून तेथे वरील वर्णनाचे वाहन मिळून आल्याने सदर वाहनाची तपासणी केली असता, त्यात ८ वासरू, एक गाय असे मिळून आले असता, चालक नामे मुंतजीर रौफ कुरेशी वय २६ रा संजयनगर, ता कोपरगांव, जि अहमदनगर. यास विचारपुस करता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याबाबत अधिक चौकशी करता वरील जनावरे हे कत्तलीसाठी नेत असल्याची खात्री झाल्याने वरील सर्व जनावरे पिकपसह व आरोपी नामे मुंतजीर रौफ कुरेशी वय २६ रा संजयनगर, ता कोपरगांव, जि अहमदनगर. यास ताब्यात घेण्यात आले आहे.

त्याबाबत येवला शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. १२३/२०२४ प्राणी संरक्षण कायदा कलम ११, ५अ, ५ ब चे उल्लंघन ९ प्रमाणे दि. २६/०३/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात आरोपी नामे मुंतजीर रौफ कुरेशी वय २६ रा संजयनगर, ता कोपरगांव, जि अहमदनगर यास अटक करण्यात आली असून त्याचे ताब्यातून ८ वासरू, १ गाय १ टाटा कंपनीची एसीई वाहन क्रमांक एमएच १५ डीके ४६२९ असे एकूण १२५०००/- रू चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री विक्रम देशमाने साो, मा. अपर पोलीस अधिक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मनमाड श्री बाजीराव महाजन साो यांच्या मार्गदर्शना खाली व पोलीस निरीक्षक विलास पुजारी, यांचे सुचनेनुसार पोउनि/डी एम लोखंडे, पोउनि / सी बी पाटील, पोना/हेंबाडे, पोना/गेटे, पोशि/दळवी, पोशि / बी पवार, पोशि/ जी पवार, यांनी केला आहे.
थोडे नवीन जरा जुने