जिल्हा परिषदेची शाळा सोडतांना गहिवरले विद्यार्थी! ठाणगाव येथे सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ,शाळेला दिला वॉटर फिल्टर

जिल्हा परिषदेची शाळा सोडतांना गहिवरले विद्यार्थी!
ठाणगाव येथे सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ,शाळेला दिला वॉटर फिल्टर


येवला :  पुढारी वृत्तसेवा


 चिखलाच्या गोळ्याला आकार देण्याचे काम करते,ती जिल्हा परिषदेची शाळा..! या शाळेत समजायला लागले तेव्हा पाऊल ठेवले आणि आज लिहिता- वाचता येते, व्यवहार कळतात ते याच शाळेमुळे..! या शाळेला सात वर्षानंतर निरोप द्यायचा म्हणजे गहिवरून येणारच...विद्यार्थ्यांचा असाच गहीवर अनुभवायला आला तो ठाणगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत...!
ठाणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील सातवीच्या वर्गाचा निरोप समारंभ कार्यक्रम   नुकताच पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटोदा केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र कुशारे होते.प्रमुख पाहुणे म्हणून राजा शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कानिफनाथ मढवई,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू शेळके,उपाध्यक्ष योगेश भवर आणि उपसरपंच कृष्णा कव्हात उपस्थित होते. प्रथमतः सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर सातवीच्या वर्गातील सृष्टी शेळके,श्रद्धा शेळके,विजय शेळके,सायली कोंढरे,कीर्ती वाघ,ओम कासार या विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतल्यापासून तर आतापर्यंतच्या आठवणींना आपल्या मनोगतातून उजाळा दिला. शाळेतील  शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीचा वापर  भविष्यात करून शाळेचे,शिक्षकांचे आणि आई वडिलांचे नाव मोठे करू असे आश्वासन दिले जिथे बालपण गेले.जीवनाला आकार मिळाला असे ज्ञान मंदिर सोडून जातांना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दुःख  दिसले अन डोळेही पाणावले. महत्वाचे वैशिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती आणि शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वतः वर्गणी गोळा करून शाळेला पाणी पिण्यासाठी फिल्टर दिले तसेच सर्वाँना भोजन दिले.कार्यक्रमाप्रसंगी केंद्रप्रमुख राजेंद्र कुशारे यांनी सर्व विद्यार्थ्यांना या पुढेही न थांबता चांगले शिक्षण घेत रहा आणि उच्च शिक्षित व्हा असे आवाहन केले तर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक कानिफनाथ मढवई  यांनी मिळालेल्या ज्ञानाचे व्यवहारामध्ये  उपयोजन करा असे सांगितले.वर्गशिक्षिका सविता शिरसाठ तसेच रंजना मडके यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक जडण घडण कशी होत गेली याचे अनुभव विशद केले. केंद्रातील प्रियांका ससे,शीतल लंबे,रचना गावडे,दिलीप चव्हाण आदी शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक सूरज झाल्टे यांनी केले तर आभार उध्दव वाघमारे यांनी केले.
फोटो
ठाणगाव : जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी उपस्थित केंद्रप्रमुख राजेंद्र कुशारे व शिक्षक.
थोडे नवीन जरा जुने