अज्ञात वाहनाने कट मारल्याने ॲपे रिक्षा रस्त्याच्या कडेला नाल्यात जाऊन चालक ठार

अज्ञात वाहनाने कट मारल्याने ॲपे रिक्षा रस्त्याच्या कडेला नाल्यात जाऊन चालक ठार

येवला : पुढारी वृत्तसेवा 

दिनांक १ जून शनिवार रोजी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास नाशिक छत्रपती संभाजी नगर महामार्गावर चारी क्रमांक 36 जवळ समीर युसुफ शेख राहणार मिलन नगर हे आपल्या कुटुंबासोबत ॲपे रिक्षा घेऊन जात असताना एका अज्ञात वाहनाने या ॲपे रिक्षाला कट मारला . यावेळी चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा थेट रस्त्याच्या कडेला नाल्यात जाऊन जोरात आदळली.  यात रिक्षा चालक समीर युसुफ शेख हे ठार झाले असून त्यांचे त्यांच्या पत्नी व दोन मुले किरकोळ जखमी झाले आहेत .
या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी खाजगी  रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला या ठिकाणी दाखल केला असून अपघाताचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती.
थोडे नवीन जरा जुने