येवल्यात भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी...

येवल्यात भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी... 
येवला : पुढारी वृत्तसेवा

  परशुराम प्रतिष्ठान व अखिल ब्राह्मण समाज मंडळ,येवला यांच्या संयुक्त विद्यामानाने भगवान विष्णूचा सहावा अवतार व ब्राम्हण समाजाचे आद्य पुरुष तसेच  रेणूकामातापुत्र भगवान परशुराम जयंती शोभयात्रेसह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

      शुक्रवार दिनांक १० मे रोजी संध्याकाळी ६ वाजता विठ्ठल मंदिर सभागृह येथून भगवान परशुरामांच्या शोभयात्रेची सुरुवात करण्यात आली. या शोभयात्रेत महिला व लहान थोरांनी उपस्थिती दाखवून आनंद लुटला,तसेच विविध संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी चौकात शोभयात्रेचे स्वागत करून आयोजकांचा सन्मान करत कौतुक केले.
चित्ररथामध्ये भगवान परशुरामाच्या प्रतिमेचे उपस्थितांनी दर्शन घेतले. शोभायात्रा जय परशुरामाच्या जयघोषात, मंगलमय वातावरणात,शिस्तबद्ध पद्धतीने विठ्ठलमंदिर,मेनरोड,बालाजी गल्ली,आझाद चौक,काळामारुती रोड व विठ्ठलमंदिर येथे सांगता झाली. 
त्यानंतर विठ्ठल मंदिर सभागृहात वेदमंत्रांचे पठण तसेच शांतीसुक्ताचे पठण करण्यात आले. त्यानंतर भगवान परशुरामांची प्रतिमापूजन व सौ सुषमा व श्री दिलीप पाटील दांपत्याच्या हस्ते आरती करण्यात आली. तसेच समाजबंधवाना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदाचे कर्तव्य बजावण्याचे आवाहन करण्यात आले. व अल्पोपहाराचा लाभ घेऊन सक्रिय कार्यकर्ते व सहकार्य करणाऱ्या बांधवांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
 या प्रसंगी ब्राह्मण समाजबांधव मोठ्या संख्याने उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने