निवडणूक निरीक्षकांची येवला विधानसभा मतदारसंघाला भेट

निवडणूक निरीक्षकांची येवला विधानसभा मतदारसंघाला भेट

येवला :  पुढारी वृत्तसेवा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर 20दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या 119 येवला विधानसभा मतदारसंघात निवडणूक निरीक्षक श्रीमती बिनिता पेगू यांनी भेट दिली .सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी श्रीमती पेगु यांचे स्वागत केले.
या भेटी दरम्यान प्रथमत: त्यांनी विंचूर चेक पोस्ट येथील स्थिर स्थायी पथकास भेट दिली.त्यांनी पथक प्रमुखांना त्यांच्या कामाबद्दल सूचना दिल्या त्याचबरोबर मार्गदर्शन केले.
यानंतर येवला तहसील कार्यालय येथे भेट देऊन निवडणूक शाखेतील कामकाजाचा बारकाईने आढावा घेतला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूम व सीसीटीव्ही चित्रीकरण कक्षाला स्वतः भेट देत तेथील कामाचा त्यांनी आढावा घेतला. या भेटीत त्यांनी निवडणूक अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्याशी सुरक्षा व आचारसंहिता याबाबत सखोल चर्चा केली.
माननीय पेगू यांनी निवडणूकपूर्व व निवडणूक पश्चात होणाऱ्या प्रक्रियेची योग्य पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आबा महाजन यांनी निवडणूक  निरीक्षक बिनिता पेगू व त्यांच्या पथकाचे आभार मानले. 
यावेळी येवला पोलीस अधिकारी विमला एम.(भा.पो.से), सहाय्यक खर्च निरीक्षक पी.एम पाठराबे, येवला शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी, लासलगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे ,गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, नायब तहसीलदार नितीन बाहीकर व निवडणूक शाखेतील सर्व कर्मचारी हजर होते.

*स्ट्रॉंगरूमच्या रचनेबद्दल व्यक्त केले समाधान*
श्रीमती पेगु यांनी स्ट्रॉंगरूम,सीसीटीव्ही चित्रीकरण कक्षाची आणि परिसराची पाहणी केल्यानंतर येथील प्रशासकीय संकुल रचनेबद्दल समाधान व्यक्त केले.
थोडे नवीन जरा जुने