खा.राहुल गांधी यांचे वाढदिवसानिमित्त कॉंग्रेसपक्षा तर्फे येवला येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्नखा.राहुल गांधी यांचे वाढदिवसानिमित्त कॉंग्रेसपक्षा तर्फे येवला येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.

येवला : पुढारी वृत्तसेवा
         येवला तालुका व शहर कॉंग्रेस कमिटी तर्फे दिनांक 19 जून 2024 रोजी येवला येथील पद्मावती लाॅन्स येथे काँग्रेस पक्षाचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त इयत्ता दहावी व बारावी मधील परीक्षेमध्ये येवला शहरासह तालुक्यातील शाळेमध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सत्कार समारंभ आयोजित करण्यात  आला होता. यावेळी प्रथमता: स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  मा.आमदार व कॉंग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष शिरीषकुमार कोतवाल उपस्थित होते.
         जिल्हाध्यक्ष कोतवाल यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा विजय चिन्ह, प्रशस्तीपत्रक, राष्ट्रीय पुरुषांचे पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच येवला येथील आयपीएस परीक्षेत कु. प्रियंका मोहिते हिने यश संपादन केल्याबद्दल तिचा जिल्हाध्यक्षांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.          कार्यक्रमाचे अध्यक्ष कोतवाल म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन अभ्यास करावा व यश संपादन करून देशाच्या सेवेत योगदान द्यावे. तसेच या देशांमध्ये संगणक क्रांतीचे प्रणेते म्हणून माजी पंतप्रधान स्वर्गीय  राजीव गांधी यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच देशाचे नेते खासदार राहुल गांधी एक उच्चशिक्षित व धिरोदत्त नेता म्हणून राहुल गांधींचा उल्लेख करता येईल. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासासोबतच देशाचा इतिहास अभ्यासण्याची गरज निर्माण झालेली आहे. काँग्रेस पक्षाचे देशाच्या स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मोलाचे योगदान आहे.
         तालुकाध्यक्ष अ‍ॅड.समीर देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात देशमुख म्हणाले की, येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे सातत्याने समाज उपयोगी व विद्यार्थ्यांच्या हिताचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यापुढेही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तसेच विद्यार्थ्यांना दहावी व बारावीनंतर काय करावे याबाबत मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित केले जाणार आहे. तसेच आजचा हा गुणगौरव समारंभ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.  
      तसेच आयपीएस परीक्षेत उत्तीर्ण झालेली प्रियंका मोहिते या विद्यार्थिनीने उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा व यश कसे संपादन करावे याबाबत बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. 
        गुणगौरव समारंभात शहराध्यक्ष प्रीतम पटणी, माजी प्राचार्य येलमामे यांनी मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिगंबर गायकवाड तसेच विद्यार्थिनी ऋतुजा घोटेकर व कल्याणी कुटे  यांनी केले. तसेच आभार एन.एस.यु.आय. तालुकाध्यक्ष अक्षय शिंदे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी माजी प्राचार्य दिनकर दाणे, प्राचार्य रामनाथ पाटील, माजी शहराध्यक्ष राजेश भंडारी, उमेश कंदलकर, बळीराम शिंदे, डॉ. मसरत शहा, राजेंद्र काळे, अण्णासाहेब पवार, सुखदेव मढवई, भाऊराव दाभाडे, बाबासाहेब शिंदे, शिवाजी निमसे, राजेंद्र घोटेकर, विलास नागरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश सोनवणे, राजेंद्र गणोरे, मंगल परदेशी, बाळासाहेब घोटेकर, बबन मिटके, शिवनाथ खोकले, दत्तू भोरकडे, गणेश ढिकले, अनिल पगारे, बाबासाहेब गोरे, बापूसाहेब खटाणे, दयानंद बेंडके, रावसाहेब लासुरे, अथर्व देशमुख, अनिकेत पडवळ, शिवेंद्रादित्य देशमुख आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच तालुक्यातून सर्व शाळांमधून आलेले गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालकही  उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने