स्वातंत्र्य दिनानिमित्त वही अंक लिपी वाटप

स्वातंत्र्य दिनानिमित्त वही अंक लिपी वाटप
येवला : प्रतिनिधी

येवला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , आडगाव चोथवा या ठिकाणी 15आँगस्ट  स्वातंत्र्य दिनानिमित्त नारायणगिरी महाराज फांडैशनचे अध्यक्ष विष्णुजी भागवत व पचांयत समितीचे उपसभापती रुपचंदभाऊ भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब अरुण आहेर यांनी स्वखर्चातून जिल्हा परिषद शाळेसाठी पहिली ते चौथी सर्व विद्यार्थांना इंग्रजी अकंलीपी ,पाचवी ते सातवीच्या सर्व विद्यार्थांना दोन वह्या वाटप  केल्या.तसेच शाळेतील कोमल पवार, निकिता खोकले, प्रियंका ठाकरे, प्रतिमा खोकले,ज्ञानेश्वरी खोकले  या सर्व गुणवंत विद्यार्थांचा सत्कार समारंभ मा.आहेर बाबासाहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने