येवला शहर पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण पोलिसातर्फे नवीन कायद्यांचे स्वागत व जनजागृती रॅली.

येवला शहर पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण पोलिसातर्फे नवीन कायद्यांचे स्वागत व जनजागृती रॅली.
येवला :  पुढारी वृत्तसेवा
केंद्र शासनातर्फे संसदेत ब्रिटिश कालीन भारतीय दंड संहिता१८६०, फौजदारी प्रकिया संहिता१९७३, भारतीय पुरावा अधिनियम १८७२ हे कायदे रद्द करण्यात येत असून या ऐवजी भारतीय न्याय संहिता - २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा  संहिता - २०२३, भारतीय साक्ष संहिता - २०२३ हे नवीन कायदे लागू करण्यात येत आहे या कायद्यांबाबत जनजागृती व्हावी तसेच या कायद्यांचे स्वागत व्हावे यासाठी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक   विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव, अनिकेत भारती , उपविभागीय पोलीस अधिकारी .बाजीराव महाजन यांच्या सूचनेनुसार स्वामी मुक्तानंद विद्यालय व जनता विद्यालय येवला येथील उपस्थित शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व विद्यार्थिनी याना नवीन कायद्याची माहिती देण्यात आली. जुने कायदे व नवीन कायद्यातील बदल याबद्दल याबाबत फरक व त्याबाबतची व्याप्ती समजावून सांगितली शाळेतील विद्यार्थ्यांसह पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाचे व नागरी वस्ती असलेल्या चौकातून व निवासी भागातून नवीन कायदा जनजागृती रॅली काढण्यात आली याप्रसंगी येवला शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सहाय्यक निरीक्षक लोखंडे साहेब, गोपनीय कर्मचारी सांगळे   पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच स्वामी मुक्तानंद विद्यालयाचे प्रा. कदम, प्रा. कुलकर्णी,  प्रा. गायकवाड  व जनता विद्यालयाचे प्रा. मधुकर आहेर, प्रा. वर्पे, प्रा. पवार, प्रा. गायकवाड  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
थोडे नवीन जरा जुने