लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र तयार करण्यासाठी तहसील कार्यालयात पायी जात असलेल्या महिलेला अज्ञात वाहनांनी उडवले महिला जागीचलाडकी बहीण योजनेचे कागदपत्र तयार करण्यासाठी तहसील कार्यालयात पायी जात असलेल्या महिलेला अज्ञात वाहनांनी उडवले महिला जागीच ठार

येवला :  पुढारी वृत्तसेवा

लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र जमा करण्यासाठी येवला तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या महिलेचा तहसील कार्यालयाकडे वळणाऱ्या गेटवरच अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. नगर मनमाड राज्य मार्गावरील प्रशासकीय संकुलाच्या गेट जवळ ही घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.

महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेसाठी कागदपत्रंची जुळवाजुळ करण्यासाठी महिला वर्गाची धावपळ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. सेतू कार्यालय बाहेर लांब सलाम रांगा लागत असून राज्यभरातील तहसील कार्यालय मध्ये महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे .
मात्र दुर्दैवानं हे कागदपत्र गोळा करण्याच्या कामानिमित्ताने तहसील कार्यालय येवला या ठिकाणी जात असलेल्या उज्वला राजीव चौधरी वय 45 , राहणार रेल्वे स्टेशन येवला या महिलेला तहसील कार्यालयाच्या गेटवर नगर मनमाड महामार्गावर एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ही महिला जागीच ठार झाली . महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला या ठिकाणी आणण्यात आला आहे . पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहेत.
थोडे नवीन जरा जुने