येवला तहसील वर सकल मातंग समाज व आंबेडकरी समचारी संघटनांचा मोर्चा

येवला तहसील वर सकल मातंग समाज व आंबेडकरी समचारी संघटनांचा मोर्चा

येवला : पुढारी वृत्तसेवा

  मातंग समाजातील युवक प्रसाद सुनिल खैरनार यांस गंभीर मारहाण करून अर्ध नग्न करत व्हिडिओ प्रसारित केलेल्या आरोपींना अटक झालेली नसून प्रसाद खैरनार यांच्यावरच उलट पोस्को गुन्हा दाखल करून दबाव आणला जात आहे. असा आरोप करीत गुन्ह्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन व्हावे व प्रसाद खैरनार याच्यावरील पोक्सो गुन्हा रद्द करावा या साठी सकल मातंग समाजासह आंबेडकरी समविचारी संघटनानी येवला तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.  तहसीलदारांना निवेदन देत आरोपी लवकर ताब्यात घेऊन पीडित तरुणाला न्याय देण्याची मागणी केली.

सुनील खैरनार, राहुल पोळ, संतोष खैरनार,राकेश आव्हाड,सतिष सोलसे, केतन खैरनार,गणेश आरणे यांच्यासह सकल मातंग समाज बांधव आणि आंबेडकरी समचारी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने