सायगावमध्ये ट्रान्सफॉर्मरची यशस्वी दुरुस्ती; अपघाताचा धोका टळला – वाढीव ट्रान्सफॉर्मरलाही मंजुरी

 सायगावमध्ये ट्रान्सफॉर्मरची यशस्वी दुरुस्ती; अपघाताचा धोका टळला – वाढीव ट्रान्सफॉर्मरलाही मंजुरी


मंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निर्णय


येवला, प्रतिनिधी | 28 जुलै 2025




"ट्रान्सफॉर्मर देतेय का कोणी ट्रान्सफॉर्मर!" या आशयाची बातमी माध्यमांतून गाजल्यानंतर अखेर सायगाव परिसरातील ढानगाई ट्रान्सफॉर्मर क्रमांक २ (100 KVA) ची तातडीने दुरुस्ती करण्यात आली. महावितरण विभागाने काम सुरू करत नवीन वाहिन्या, कनेक्टर, फ्युज पेटी बॉक्स बसवले असून शॉर्टसर्किट व अपघाताचा धोका पूर्णतः टळला आहे.



✅ शेतकऱ्यांची दोन वर्षांची प्रतीक्षा संपली


29 ऑगस्ट 2023 रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात मागणी केली होती की, निमदरी वस्ती येथे वाढीव ट्रान्सफॉर्मर बसवावा.

या मागणीस तब्बल दोन वर्षांनंतर अखेर प्रतिसाद मिळाला असून, पुरवणी यादीत निमदरी वस्तीचा समावेश करण्यात आला आहे.

नवीन 100 KVA ट्रान्सफॉर्मरला जिल्हा वार्षिक योजनेतून मंजुरी मिळाली आहे.


🔧 फ्युजऐवजी तारा टाकल्याने मोठे नुकसान


वाहिन्या आणि फ्युज जीर्ण झाल्यामुळे काही ठिकाणी फ्युजच्या जागी जाड तारा टाकण्यात आले होते, ज्यामुळे विद्युत प्रवाह खंडीत न होता शेतकऱ्यांचे विद्युत मोटार पंप जळण्याच्या घटना घडत होत्या.

आता संपूर्ण दुरुस्ती केल्यानंतर ही समस्या कायमची दूर झाली आहे.


 प्रतिक्रिया: 


"शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे व तांत्रिक गरज लक्षात घेऊन निमदरी वस्तीला नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला आहे. लवकरच त्याची उभारणी केली जाईल."

— दिलीप खैरे, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस


##########


 "ढानगाई ट्रान्सफॉर्मरची संपूर्ण दुरुस्ती झाली असून सर्व सुटे भाग, फ्युज, वायरिंग नव्याने बसवण्यात आले आहे."

— रवींद्र पाटील, अभियंता, महावितरण


🔍"तालुक्यातील सर्व ट्रान्सफॉर्मर, वाहिन्या व फ्युज बॉक्स यांची गुणवत्ता आणि सुरक्षा दृष्टीने तपासणी व्हावी. शेतकऱ्यांनी मंजूर भारापेक्षा अधिक वीज वापरू नये व सर्व जोडण्या अधिकृत करून घ्याव्यात."

— भागवतराव सोनवणे, संयोजक, शेतकरी कर्जमुक्ती अभियान


🟢 आता सायगाव परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित, कार्यक्षम होणार आहे.

शेतकऱ्यांच्या दीर्घ प्रतीक्षेला यश मिळाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने