*मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून....*

 *मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून....*


*देशमाने बु, आडगाव रेपाळ रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी २८ लाखांच्या कामाला प्रशासकीय मान्यता*

*देशमाने बु, शिरसगाव लौकी, लौकी शिरसगाव व आडगाव रेपाळ रस्त्यावरील पुलामुळे दळणवळण होणार अधिक सुलभ*




येवला,दि.१९ ऑगस्ट:-* राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून येवला तालुक्यातील देशमाने बु, शिरसगाव लौकी, लौकी शिरसगाव व आडगाव रेपाळ रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी २८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या पुलाच्या कामामुळे देशमाने बु, शिरसगाव लौकी, लौकी शिरसगाव व आडगाव रेपाळ पंचक्रोशीतील नागरिकांचे दळणवळण अतिशय सुलभ होणार आहे.


देशमाने बु, शिरसगाव लौकी, लौकी शिरसगाव व आडगाव रेपाळे रस्त्यावरील व्हीआर ५३ साखळी क्रमांक १४/१७० येथे पुलाचे बांधकाम करण्याची नागरिकांची मागणी होती. त्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. त्यानुसार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आशियाई विकास बँक बॅच २ मधील बचतीमधून येवला तालुक्यातील देशमाने बु, शिरसगाव लौकी, लौकी शिरसगाव व आडगाव रेपाळ रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी २८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच या पुलाच्या बांधकामानंतर पुढील पाच वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी देखील निधीची तरतूद करण्यात आली आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांचे दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने