ब्रह्माकुमारीज् येवला सेवाकेंद्र आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

 ब्रह्माकुमारीज् येवला सेवाकेंद्र आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

देशभरात एक लाखाच्यावर रक्तदात्यांनी केले रक्तदान

येवला:



 ब्रह्माकुमारीज संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १८ व्या पुण्यतिथी व विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्ताने ब्रह्माकुमारीज् येवला सेवाकेंद्रात झालेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 50 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. 

ब्रह्माकुमारीज संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १८ व्या पुण्यतिथी व विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्ताने संस्थेतर्फे भारतासह नेपाळात रक्तदान महाअभियान शिबिर आयोजित केले गेले. या शिबिराद्वारे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्यात येणार आहे. ब्रह्माकुमारीज् विद्यालय, येवला पटेल कॉलनीमध्ये सकाळी शिबिराचे रजिस्ट्रेशन झाले आणि डॉ. रमाकांत सोनवणे अधीक्षक ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येवला व दीप्ती सोनवणे स्त्रीरोगतज्ञ,सिद्धिविनायक हॉस्पिटल,येवला यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले.


 या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नरेंद्र दराडे,नेत्ररोग तज्ञ डॉ.गणेश सवलके व सौ.प्रियंका सवलके, स्री रोग शल्य चिकित्सक डॉ.राजीव चंडालिया, भूलतज्ञ डॉ.विनोद गायकवाड, मालेगाव ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी सौ शोभा सुमराव, संचालक डॉ. अमोल सोनवणे त्यांची संपूर्ण टीम, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ पिनल वर्मा तसेच त्यांची संपूर्ण टीम व इतरही मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात 50 पेक्षा अधिक लोकांनी रक्तदान केले याप्रसंगी ब्लड बँक तर्फे ब्रह्माकुमारी विद्यालयाने राबविलेल्या या शिबिराबद्दल मालेगाव ब्लड बँकेच्या टीम तर्फे आयोजक ब्रह्माकुमारी नीतादीदी व ब्रह्माकुमारी अनुदीदी यांना सन्मानित केले. रक्तदान करण्यासाठी आलेल्या सर्व नागरिकांना ब्रह्माकुमारीतर्फे प्रशस्तीपत्रक,काचेची ट्रॉफी,एनर्जी ड्रिंक, बिस्कीट पॅकेट, ईश्वरीय प्रसाद देण्यात आला.

देशभरात  एक लाखापेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे उदिष्ठ आहे.  भारत आणि नेपाळ सहित ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्राच्या माध्यमातून झालेल्या रक्तदान शिबिरातून ग्रिनिज बुक ऑफ रेकॉर्ड होणार असल्याचे सेवाकेंद्र संचालिका ब्रह्माकुमारी नीतदिदी यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने