विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या पाच विद्यार्थिनींची शालेय कॅरम स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

  



विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या पाच विद्यार्थिनींची शालेय कॅरम स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

सलग तिसऱ्या वर्षी खेळाडू विभागस्तरावर

येवला : 



शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवकसेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद नाशिक, आयोजित जिल्हास्तरीय 14-17-19 वयोगटाखालील ( मुली) यांच्या शालेय कॅरम स्पर्धा नुकत्याच 25 ऑगस्ट रोजी एकूण 226 विद्यार्थ्यांच्या सहभागाने नासिक येथील विभागीय क्रीडा संकुल येथे मोठ्या उत्साहात व अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्यात.सदर स्पर्धेत विद्या इंटरनॅशनल स्कूलचा 14 वर्षाखालील मुलींच्या वयोगटात इयत्ता  सातवीतील विद्यार्थिनी कु.सिद्धी राजेश कचोलीया  ,17 वर्षा आतील मुलींच्या वयोगटात इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. गुंजन विशाल नवगीले हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून तिच्या वयोगटात चतुर्थ क्रमांक प्राप्त केला,तसेच 19 वर्षाआतील मुलीच्या वयोगटात  कु.आर्या समीर कासलीवाल हिने विजेतेपद  मिळून स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व मिळवले व प्रथम क्रमांक प्राप्त केला, कु.जान्हवी अल्पेश पटणी हिने उपविजेतेपद मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तसेच कु.रिद्धी राजेश कचोलीया हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. नासिक येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे,व कलात्मक गुणांचे प्रदर्शन करून सर्व विद्यार्थिनींनी नासिक विभागीय संघात स्थान मिळवले.व त्यांची पुढील महिन्यात होणाऱ्या विभागीय कॅरम स्पर्धेसाठी त्याची नासिक विभागीय संघात निवड झाली. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक डॉ.राजेश पटेल ,डॉ.संगीता पटेल ,शाळेच्या प्राचार्या सौ.शुभांगी शिंदे मॅडम आणि सर्व  शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. सदर खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले..

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने