*एन्झोकेममध्ये 11वीच्या विद्यार्थ्यांचे वाजतगाजत स्वागत*
येवला ता. 11
येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम हायस्कूल व श्रीमान गंगाराम छबीलदास शेठ उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांचा वाजतगाजत स्वागत करून प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई व तात्या टोपे यांच्या प्रतिमेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सरचिटणीस सुशील गुजराथी, प्रशासनाधिकारी दत्ता महाले, प्राचार्य अनिल शेलार, माजी प्राचार्य दत्तकुमार उटवाळे, उपप्राचार्य कैलास धनवटे, पर्यवेक्षक बापू कुलकर्णी यांच्या हस्ते पूजन करून झाली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना प्राचार्य अनिल शेलार यांनी विद्यालयाच्या यशाचा लेखाजोखा उपस्थित पालकांसमोर मांडला. त्यानंतर 11वीतील नवीन विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर उच्च माध्यमिक विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी नवीन विद्यार्थ्यांना आपापली ओळख करून दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी प्राचार्य दत्तकुमार उटवाळे यांनी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे नियम व शिस्त याबाबत माहिती दिली. प्रशासनाधिकारी दत्तकुमार महाले यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी विद्यालयात नियमित व 100% उपस्थित राहावे तसेच विद्यालयाची शिस्त काटेकोरपणे पाळावी असे सांगितले. शिस्तभंग करणाऱ्यास विद्यालयातून प्रवेश नाकारला जाईल असे त्यांनी पुढे सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे व प्रामाणिकपणे अभ्यास करून स्वतःचा विकास घडवून आणावा व स्वतःचे आणि शाळेचे नाव उज्वल करावे असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना संस्थेचे सरचिटणीस सुशील गुजराथी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे व शिस्तीचे महत्व पटवून सांगतानाच शालेय शिस्तीच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असेही सांगितले. उपस्थित पालकांपैकी दीपक सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राध्यापकांपैकी किशोर सोनवणे, स्वाती सानप व कैलास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन डॉ. सुहासिनी शिंदे यांनी केले, आभार पुष्पा कांबळे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी उच्च माध्यमिक विभाग प्रमुख कैलास पाटील, विजय साळुंके, सर्व शिक्षक कर्मचारी व बहुसंख्य पालक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मयुरी कासार, शितल शिंदे पुनम वारुळे, रीना पाबळे, गोविंद सुंबे, जनार्दन भनगडे, सुनील कोटमे, अंकुश गाडेकर, सतीश विसपुते गीताश्री शिंदे, रमेश माळी यांनी विशेष परिश्रम घेतले.