*येवला व्यापारी महासंघाचा 5 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.*
ज्येष्ठ व्यावसायिकांचा सत्कार करत वर्धापन दिन केला साजरा.
येवला व्यापारी महासंघाचा 5 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला . सुमारे पाच वर्षांपूर्वी कोरोना काळामध्ये येवला व्यापारी महासंघाची स्थापना झाली. प्रशासन व व्यापारी यांच्यामध्ये प्रचंड तणाव निर्माण व्हायचा त्यामुळे कुठेतरी व्यापारी संघटित व्हावे त्यांच्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा या उद्देशाने 7 ऑगस्ट 2020 रोजी व्यापारी महासंघाची स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर प्रशासनाशी संवाद सामन्यासाठी एक कोर कमिटी तयार करण्यात आली. त्यात योगेश सोनवणे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तिथून येवला व्यापारी महासंघाचा प्रवास सुरू झाला. जसा जसा प्रवास पुढे सुरू झाला व्यापारी बांधवांनी केवळ व्यापारी समस्याच नाही तर सामाजिक व धार्मिक या सर्व उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवावा असे सर्वानुमते हा विषय पुढे आला. सामाजिक बांधिलकी राखत येवला व्यापारी महासंघाने दोन मोठे रक्तदान शिबिर घेतले. विठ्ठलाचे कोटमगाव येथे आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या एक दिवसीय यात्रेकरिता भाविक भक्तांसाठी फराळ व पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून व्यापारी महासंघाने सुमारे चार वर्षापासून देवीचे कोटमगाव येथे मोठ्या प्रमाणात खिचडी व पाणी पाऊच वाटप करत असते. संघर्षातून सुरुवात झालेल्या या व्यापारी महासंघाला येवले शहरातील व्यापारी बांधव मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात .व्यापारी महासंघ कोणती वार्षिक वर्गणी कोणत्या व्यापाऱ्यांकडून घेत नाही. केवळ आषाढी एकादशीनिमित्त जमा होणाऱ्या व लागणाऱ्या खर्चा करिता व्यापारी महासंघ वर्गणी स्वीकारतो व त्याच्यातून उरलेल्या पैशातून पूर्ण वर्षभर सामाजिक धार्मिक उपक्रम राबवत असतो.
आजच्या या कार्यक्रमानिमित्त सिद्धार्थ लॉन्स येथे येवला व्यापारी महासंघाने आपला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. येवले शहरात ज्या व्यावसायिकांना आपल्या दुकानात पन्नास वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक झाले असेल अशा व्यावसायिकांचा व ज्येष्ठांचा सत्कार समारंभ यावेळी करण्यात आला. सर्वप्रथम दीप प्रज्वलन व लक्ष्मी , श्री गणेशाचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री काकासाहेब कोयटे हे अध्यक्षस्थानी होते .कोपरगाव व्यापारी महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष श्री सुधीरजी डागा , मनमाड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक , येवल्याचे भूमिपुत्र व नाशिक येथील उद्योजक किशोर राठी , सचिनजी पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या दरम्यान येवल्यातील सुप्रसिद्ध लिटिल चॅम्प गायक कु.आम्रपाली पगारे हीने आपल्या गायनाचा कार्यक्रम केला. ए मेरे वतन के लोगो हे गाणे गाऊन तिने उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. उपस्थितानी तिला रोख स्वरूपात बक्षीस देऊन प्रोत्साहन दिले . सुमारे 96 व्यापारी बांधवांनी येवला व्यापारी महासंघाकडे नावे नोंदवली होती. यावेळी ट्रॉफी , सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले .याप्रसंगी सुधीरजी डागा , राजेंद्र पारिक , सचिन पाटील , किशोर राठी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. येवला व्यापारी महासंघातर्फे प्रास्ताविक अध्यक्ष योगेश सोनवणे यांनी केले. याच दरम्यान येवला व्यापारी महासंघ महिला ब्रिगेड व येवला व्यापारी महासंघ युवा ब्रिगेड याची देखील नव्याने स्थापना करण्यात आली. लवकरच त्यांची कार्यकारणी घोषित करण्यात येईल असे अध्यक्ष योगेश सोनवणे यांनी सांगितले. उपस्थितांतर्फे शैलेश लाड सर व विजय चंडालिया यांनी आपली मनोगते व्यक्त केली. आपले अध्यक्षीय भाषणामध्ये काकासाहेब कोयटे यांनी व्यापाऱ्यांनी संघटित होणे खूप गरजेचे आहे .ऑनलाइन शॉपिंग व्यवस्था , व्यापारी महासंघाने भविष्यात करावयाची कामे या सर्व विषयांवर मौलिक मार्गदर्शन उपस्थित व्यापारी बांधवांना केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी त्या यशस्वी करण्याकरिता येवला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे , कार्यकारी अध्यक्ष अविनाश कुक्कर , उपाध्यक्ष रितेश बुब , रविंद्र पवार , सचिव सुमित थोरात , खजिनदार प्रसाद खांबेकर ,
आर्थिक सल्लागार सनदी लेखापाल अजय सोमानी , अमित पटेल , मयुरेश पटेल , राहुल भावसार , अतुल काथवटे , राम बगदाणे , दीपक पाटोदकर , वाल्मीक सोपे , पवन जेजुरकर , योगेश तक्ते आदी व्यापारी बांधवांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन येवला व्यापारी महासंघाचे मार्गदर्शक ज्येष्ठ व्यापारी विजय चंडालिया यांनी केले.