येवल्यात महा पर्युषण पर्वाची भव्य मिरवणुकीने सांगता
येवला :
येवल्याची पारंपरिक हलकी,ढोल ताशांचा गजर,अग्रभागी गुरुमहाराजांचा रथ, यांची भव्य मिरवणूक काढून महापर्युषण पर्वाची सांगता भव्य, मिरवणुकीने झाली. टिपरी नृत्य आणि युवकांचे आनंदी नृत्य यांचेसह तब्बल तीन तास शोभायात्रा चालली. येवला येथील गुलाबराव महाले यांनी वयाच्या 93 व्या वर्षी हे 24 वे अठ्ठाई तप केले आहे. आठ दिवसांचे फक्त पाणी घेत निरंकार उपवास,अठ्ठाई तप,केले. सार्थक समदडीया, वृषभ पटणी, नमिष्व पटणी यांनी प्रथम अठ्ठाई तप केले आहे.
रथाचे सारथ्य गुलाबराव महाले यांनी केले. छोटे मोठे उपवास करणारे,लहान बालकांनी देखील मिरवणुकीत सहभाग घेतला होता. डॉ. स्वप्नील शहा, सुदेश पटणी, शेखर मेहता, सचिन पटणी, स्नेहल पटणी, पंकज शहा, सतीश समदडीया, अमित मेहता, वैभव मेहता, संकेत पटणी, निखिल पटणी, दत्ता महाले, दत्तकुमार उटवाळे,सनी पटणी, सागर पटणी, दिप्तेश पटणी, दिलीप पटणी, विलास पटणी यांचेसह जैन,अजैन बंधुभगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.