ग्रामरत्न सरपंच गौरव पुरस्कार सुनीता बापूसाहेब गायकवाड यांना

 पंचायत राज विकास मंच व अखिल भारतीय सरपंच परिषद ह्यांचा ग्रामरत्न सरपंच गौरव पुरस्कार सुनीता बापूसाहेब गायकवाड यांना 



येवला  -पंचायत राज विकास मंच व अखिल भारतीय सरपंच परिषद यांनी महाराष्ट्रतील वैशिष्ट्येपूर्ण काम करणाऱ्या सरपंच यांचा ग्रामरत्न सरपंच गौरव या पुरस्कारणे गौरविण्यात आले, 




या वेळी महाराष्ट्र राज्यातून 50 सरपंचांना हा पुरस्कार देण्यात आला या वेळी नाशिक जिल्ह्यातून अनकुटे येथील सरपंच सुनीता बापूसाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली व लोणावळा येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अखिल भारतीय सरपंच परिषद संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील व समितीने ही निवड केली, जयंत पाटील, मा. आयुक्त व रयत शिक्षण संस्था चेअरमन चंद्रकांत दळवी, इतिहासकार श्रीमंत कोकाटे, जलतज्ज्ञ सतिश खाडे, जल अभ्यासक अनिल पाटील या मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार वितरण करण्यात आले, सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल मा आमदार मारोतराव पवार, युवानेते संभाजीराजे पवार, मनोज रंधे, कांतीलाल साळवे, भावराव गायकवाड, विनोद कोळगे, भिमराज गायकवाड, ललिता लेकुरवले, शिवाजी गायकवाड, निलेश चव्हाण, अनिता बाळासाहेब गायकवाड, शोभा तळेकर, कैलास गायकवाड, सोमनाथ गायकवाड, प्रकाश गायकवाड, बाळू बोंबले, किशोर गायकवाड ग्रामसेवक योगिता निरभवने, ग्रामसेवक सुभाष गवई आदींसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.



टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने