एस एन डी पॉलिटेक्निक मध्ये विध्यार्थांसाठी इंडक्शन प्रोग्राम चे आयोजन
शिक्षणामध्ये सातत्य ठेऊन आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा : न्यायधीश विनायक लोंढे
येवला :
जगदंबा शिक्षण संस्थेच्या एस एन डी पॉलिटेक्निकमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ प्रथम वर्ष प्रवेश घेतलेल्या विध्यार्थांसाठी इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा व सत्र न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश विनायक लोंढे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्तीत होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले तसेच पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा. उत्तम जाधव यांचे हस्ते प्रमुख मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला. प्रथम वर्ष समन्वयक प्रा. संतोष खंदारे यांनी प्रास्ताविकामध्ये प्रमुख मार्गदर्शकांची ओळख करून दिली तसेच ग्रामीण व शहरी भागातून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पॉलिटेक्निक मध्ये प्रवेश घेतात या विध्यार्थांना तंत्राशिक्षानातील शैक्षणिक बाबींची माहिती देऊन त्याबद्दल विध्यार्थांमध्ये आवड निर्माण करणे, तंत्रशिक्षनात असणाऱ्या विविध शाखा, अभ्यासक्रम, रोजगाराच्या संधी, विध्यार्थांचे व्यक्तिमत्व विकास याविषयी माहिती देण्यासाठी तज्ञ व्याख्यात्यांचे व्याख्यान आयोजित करून विध्यार्थांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली.
प्रमुख मार्गदर्शक न्यायाधीश विनायक लोंढे यांनी विध्यार्थांना मार्गदर्शन करतांना मानवी हक्क व अधिकार याविषयी सखोल माहिती दिली. आदर्श व्यक्ती म्हणून जीवन जगत असतांना आवश्यक असलेल्या मानवी मूल्यांबद्दल विध्यार्थांशी संवाद साधला. तसेच विद्यार्थी जीवनात शिक्षणाचे असलेले महत्व, ध्येय पूर्ण करण्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न हा आपल्याला यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचवितो त्यासाठी शिक्षणात सातत्य ठेऊन आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे अवाहन त्यांनी केले. ग्रामीण भागात तंत्रशिक्षणाबद्दल जागृती निर्माण करून विध्यार्थांना स्पर्धेच्या युगात एक नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले पॉलिटेक्निक, येथे शिक्षण घेऊन नोकरी व्यवसायाच्या निर्माण होत असलेल्या संधी, विध्यार्थांना दिल्या जाणाऱ्या अत्याधुनिक सुविधा, विध्यार्थाच्या सर्वांगीण विकासासाठी पॉलिटेक्निक मध्ये होत असलेले विविध उपक्रम पॉलिटेक्निकचा बदलता अभ्यासक्रम औद्योगिक क्षेत्रातील वाढती मागणी विध्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर असलेला भर यामुळे एस एन डी पॉलिटेक्निक च्या विविध विभागांना गुणवत्तेच्या आधारावर मिळालेले एन बी ए चे मानांकन याविषयी प्राचार्य प्रा. उत्तम जाधव यांनी माहिती दिली. सुनंदा इन्फोटेक चे संचालक सिद्धार्थ मांडवडे यांनी कॉम्पुटर क्षेत्रातील उपलब्ध असलेल्या विविध सुविधा व त्याचे महत्व तसेच डिजीटल युगात काम्पुटर क्षेत्रातील विविध संधी याविषयी सविस्तर माहिती दिली. समता दुत चंद्रकांत इंगळे यांनी व्यक्तिमत्व विकास याविषयी विध्यार्थांसोबत संवाद साधून विध्यर्थाचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले. एस एन डी पॉलिटेक्निकचे मेकॅट्रोनिक्स विभागप्रमुख प्रा. रविकुमार ताकसांडे तंत्राशिक्षानातील परिणाम आधारित शिक्षण याविषयी विध्यार्थांना मार्गदर्शन केले. तंत्रशिक्षनात सामाविस्थ करण्यात आलेल्या योगा व ध्यान या विषयी मार्गदर्शनासाठी तज्ञ व्याख्याते भागवत जाधव यांनी विध्यार्थांना विद्यार्थी जीवनात योगाचे महत्व व ध्यान केल्याणे स्मरणशक्ती सक्रीय राहण्यास होत असलेली मदत व त्याचे महत्व तसेच व्यक्तिमत्व विकास यावर विध्यार्थांना मार्गदर्शन केले. एस एन डी अभियांत्रिकी महाविध्यालायातील सिव्हील विभागातील प्राध्यापक डॉ. प्रितम मालकर यांनी सिव्हील विभागातील बदलते स्वरूप व त्याचे महत्व याविषयी विध्यार्थांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. राजश्री म्हस्के, प्रा. वृषाली होळकर, प्रा. प्रियंका जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी प्राचार्य विभागप्रमुख ,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.


