एन्झोकेमच्या गणरायाचा 'स्वच्छ भारत'चा संदेश

 एन्झोकेमच्या गणरायाचा 'स्वच्छ भारत'चा संदेश


येवला - 



दरवर्षीप्रमाणे यंदाही वेगळेपण जपून व सामाजिक जाणीव ठेवून समाजाला स्वच्छतेचा संदेश देत येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालयाच्या गणरायाचे ढोलताशा व डीजेच्या गजरात आगमन झाले.  विद्यालयाच्या गणरायाचे सालाबादप्रमाणे या वर्षीही शहरातून वाजतगाजत मिरवणूकीद्वारे आगमन झाले.



 मिरवणुकीत विद्यालयाच्या 10वीच्या मुलींचे झांज पथक, 6 वी व 7वीच्या मुलींचे लेझीम पथक, 8वी व 9वीच्या मुलींचे टाळ नृत्य पथक व 11वीच्या मुलींच्या गरबा पथक यांनी शहरातील प्रमुख चौकांत उत्कृष्ट नृत्ये सादर करून शहरवासीयांसाची मने जिंकून घेतले. 'स्वच्छ भारत'चा संदेश देणारा विद्यालयाचा चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होता. चित्ररथावर हर्षद टाक, अनंत धनवटे, धनश्री चेमटे व श्रावणी खैरे हे गणपती व रिद्धी-सिद्धीच्या वेशभूषेत आरूढ होते. विदयार्थ्यांनी लाठीकाठी व चक्र फिरविण्याची चित्तथरारक प्रात्यक्षिके मिरवणुकीत सादर केली. 

       विद्यालयात संस्थेचे प्रशासनाधिकारी व माजी प्राचार्य दत्तकुमार महाले यांनी सपत्नीक गणरायाची प्रतिष्ठापना केली.

 कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य अनिल शेलार, उपप्राचार्य कैलास धनवटे, पर्यवेक्षक बापू कुलकर्णी, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख कैलास पाटील, उत्सवप्रमुख डॉ. सुहासिनी शिंदे, संदीप जेजुरकर, माजी प्राचार्य दत्तकुमार उटवाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कलाशिक्षक प्रकाश सोनवणे, रमेश माळी, सतीश विसपुते, प्रसेन पटेल, विजय क्षीरसागर, वीणा पराते, सरस्वती नागपुरे, आसावरी जोशी, सारिका चौधरी, रामेश्वरी शिंदे, पुष्पा कांबळे, स्वाती सानप, पूनम वारुळे, सुरेखा गिरासे, वैशाली शेलार, अंकुश गाडेकर, निलेश निकम, किशोर सोनवणे, विशाल कळमकर, सुनील कोटमे, राम पटेल, गोविंद सुंबे, विजय पैठणे, जनार्दन भनगडे, मच्छिन्द्र नाईकवाडे, सचीन बोढरे, पौर्णिमा खैरनार, सविता महाले, रुपाली मोरे, मयुरी कासार, हर्षाली धकाते, सागर लोणारी, अंकुश ललवाणी, अनिल पगारे, मारुती माळी, भास्कर लहरे, विजय मोकळ, संदीप खोजे यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने