दि.01 ऑगष्ट महसुल दिन व महसुल सप्ताह शुभारंभ निमित्ताने आयोजित कार्यक्रम
महसुल दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाच्या वतीने दिनांक ०१ ऑगस्ट ते ०७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. महसुल सप्ताह शुभारंभाच्या निमित्ताने येवला प्रशासकीय संकुलातील तहसिल कार्यालयात उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधत प्रशासकीय परिसर संकुलातील अधिकारी व कर्मचारी यांचेकरिता सकाळी 9 ते 11 या कालावधीत विशेष आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी स्वतःची आरोग्य तपासणी करुन इतरांनी देखिल आरोग्य तपासणी करावी यासाठी पुढाकार घेतला. आरोग्य अधिकारी डॉ. कुणाल दहिफळे आणि त्यांच्या टीमने उपस्थितांची आरोग्य तपासणी केली.
महसुल सप्ताहाच्या निमिताने प्रथमदिनी गतवर्षात उत्कृष्ठ काम करणा-या महसुल विभागातील नायब तहसिलदार पंकज मगर, सहा. महसुल अधिकारी बाळासाहेब हावळे, संजय आव्हाड, मंडळ अधिकारी एम.बी. गायके, ग्राम महसुल अधिकारी वैभव भड, महसुल सहाय्यक मनौज वाघ, परेश रायजादे, वाहनचालक मंगेश लोंढे, ज्ञानेश्वर डमाळे शिपाई दत्तु रौंदळ, गंगाधर ठोंबरे, महसुल सेवक प्रविण सोनवणे इ. निवडक अधिकारी व कर्मचारी यांचा गुलाब पुष्प व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच याप्रसंगी मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नत झालेले पी.पी. केवारे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मंडळ अधिकारी गणेश लाडेकर यांची जिल्हा स्तरावर उत्कृष्ठ मंडळ अधिकारी म्हणून निवड झाल्याने त्यांचादेखिल सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी सर्वांशी संवाद साधत मार्गदर्शन करतांना "सामान्य नागरिक व शेतकरी हा केंद्रबिंदू मानुन प्रत्येक महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी आजच्या डिजीटल युगात काळाची गरज लक्षात घेऊन स्मार्ट काम, आरोग्य संतुलन व आर्थिक नियोजन या त्रिसुत्राचा वापर करण्यावर सर्वांनी भर द्यावा. असे प्रतिपादन केले.
तसेच तहसिलदार आबा महाजन यांनी उपस्थितांना संबोधित करताना "महसुल विभाग हा शासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. गतिशिलता, पारदर्शकता व उत्तरदायित्व हे तत्व सर्व महसुल कर्मचारी यांनी अंगिकारावे. तसेच प्रशासनातील महसुल हा एक महत्वाचा घटक असल्याने महत्वपूर्ण व जबाबदारीची भूमिका बजवावी असे आवाहन केले."
या कार्यक्रमासाठी तहसिलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदिप वायाळ, निवासी नायब तहसिलदार पंकज नेवसे, नायब तहसिलदार नितीन बाहीकर, हिरा हिरे, महेंद्र गांगुर्डे व प्रशासकीय संकुलातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नायब तहसीलदार विवेक चांदवडकर यांनी केले तर निवासी नायब तहसिलदार पंकज नेवसे यांनी आभार मानले.