*विविध योजनांच्या लोकजागृतीसाठी महसूल दूतांची भूमिका महत्त्वाची*



*विविध योजनांच्या लोकजागृतीसाठी महसूल दूतांची भूमिका महत्त्वाची*




महसूल विभागाद्वारे देण्यात येणाऱ्या सेवांची लोकजागृती करून लोकसहभाग वाढवण्यासाठी महसूल दूतांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. येवला येथील तहसील कार्यालयातर्गत महसूल दुतांची नेमणूक करण्यात आली.

 दिनांक 01 ऑगस्ट ते  07 ऑगस्ट 2025 या कालावधीत महसूल सप्ताह 2025 साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने नवनियुक्त महसूल दूतांना मार्गदर्शन करण्यासाठीचा प्रशिक्षण वर्ग तहसीलदार आबा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे व निवडणूक नायब तहसीलदार नितीन बाहिकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.



महसूल विभागांतर्गत येणाऱ्या विविध योजना व सेवा यांची लोकजागृती करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयातून एक कार्य कुशल युवती व युवक यांची महसूल दूत म्हणून नेमणूक करण्यात आली.या प्रशिक्षणात महसूल दुतांनी आपली भूमिका व जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन तहसीलदार येवला यांच्या दालनात आयोजित करण्यात आले.यावेळी नवनियुक्त महसूल दूतांना तहसीलदार आबा महाजन यांच्या स्वाक्षरीची ओळखपत्र देण्यात आले.



*महसूल दुतांची भूमिका*


1. डिजिटल क्रॉप सर्वे प्रणाली द्वारे पीक पाहणी नोंदविणे.


2. ई हक्क प्रणालीचा 11 प्रकारच्या फेरफार नोंदी सातबारा वर घेण्यासाठी वापर करणे. 


3. महसूल विभागामार्फत शैक्षणिक व नोकरीसाठी आवश्यक प्रमाणपत्र व दाखले यांच्या सेवेसाठी लागणारी कागदपत्रे प्रशिक्षण यांची माहिती देणे.


4. महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचून लोक जागृती करणे.



*महसूल दुतांचा होणार सन्मान*


उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूल दुतांचा 26 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने