*मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा होणार विकास*
*येवला विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीत ४ कोटी ७० लाख रुपयांची विविध विकास कामे मंजूर*
*रस्ता काँक्रिटीकरण, पाण्याची टाकी, पाणी पुरवठा, भूमिगत गटार, एलईडी स्ट्रीट लाईटसह विविध विकास कामांचा समावेश*
*नाशिक,येवला,लासलगाव,दि.६ सप्टेंबर :-* राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास करणे सन २०२५ – २६ योजनेअंतर्गत ४ कोटी ७० लाख रुपयांच्या विविध विकास कामांना नाशिक जिल्हा परिषदेकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या माध्यमातून येवला विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीत रस्ता काँक्रिटीकरण, पाण्याची टाकी, पाणी पुरवठा, भूमिगत गटार, एलईडी स्ट्रीट लाईटसह विविध विकास कामे करण्यात येणार आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास करणे सन २०२५ – २६ योजनेअंतर्गत मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला तालुक्यातील अंगुलगाव येथील सिद्धार्थ नगर येथे पाणी पुरवठा करण्यासाठी १० लाख, रमाई नगर रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ७ लाख, आंबेडकर नगर येथे पाणी पुरवठा करण्यासाठी १० लाख, आडसुरेगाव भीमरत्न नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ८ लाख, ठाणगाव रमाई नगर येथे पाण्याची टाकी व पाईपलाईन करण्यासाठी ४ लाख ९९ हजार, रमाई नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ७ लाख, अंगणगाव आण्णा भाऊ साठे नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी २ लाख, सिद्धार्थ नगर येथे भूमिगत गटार करण्यासाठी २ लाख, उंदीरवाडी आंबेडकर नगर रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ५ लाख, आहेरवाडी आंबेडकर नगर १ मध्ये व आंबेडकर नगर ३ मध्ये रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रत्येकी ७ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
येवला तालुक्यातील नांदूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ८ लाख, बल्हेगाव रमाईनगर येथे एलईडी स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी २ लाख ३० हजार, भीमनगर येथे एलईडी स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी २ लाख, कुसूर आण्णाभाऊ साठे नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ५ लाख, अनकाई डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ७ लाख, अंदरसूल रोहिदास नगर येथे एलईडी स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी ६ लाख, आंबेडकर नगर येथे भूमिगत गटार करण्यासाठी ४ लाख ५० हजार, लहूजी वस्ताद नगर येथे भूमिगत गटार करण्यासाठी ७ लाख, भुलेगाव भिमाई नगर, आंबेडकर नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण प्रत्येकी ७ लाख, आंबेडकर नगर येथे एलईडी स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी ६ लाख, देवठाण सिद्धार्थ नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ७ लाख, भीमनगर येथे एलईडी स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी २ लाख, आंबेडकर नगर एलईडी स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी ४ लाख, देशमाने येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
येवला तालुक्यातील जळगाव नेऊर रोहिदास नगर येथे एलईडी स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी ६ लाख, भीमनगर येथे पाणी पुरवठा करण्यासाठी ५ लाख, गणेशपूर रोहिदास नगर येथे एलईडी स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी ४ लाख, नगरसूल आण्णाभाऊ साठे नगर भूमिगत गटार करण्यासाठी १० लाख, म्हसोबा वस्ती जवळील बागुल वस्तीत भूमिगत गटार करण्यासाठी १० लाख, मातुलठाण डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी १० लाख, सोमठाण देश कांबळे वस्तीत एलईडी स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी ६ लाख, आंबेडकर नगर येथे पाण्याची टाकी व पाईपलाईन टाकण्यासाठी ४ लाख ५० हजार, गवंडगाव रमाईनगर येथे पाणी पुरवठा करण्यासाठी १० लाख, राजवाडा येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ८ लाख, चिचोंडी बु. चव्हाण वस्तीत रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ७ लाख, देवळाणे आंबेडकर नगर येथे पाणी पुरवठा करण्यासाठी ५ लाख ५० हजार, अनकुटे येथील आंबेडकर नगर, आण्णाभाऊ साठे नगर रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रत्येकी ५ लाख, महेंद्र पगारे वस्ती येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ७ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
येवला तालुक्यातील पन्हाळसाठे रमाईनगर पिंपळखुटे ३ रे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रत्येकी १० लाख, धुळगाव सखाराम नगर येथील रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ५ लाख, शेवगे रमाई नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ७ लाख, मुखेड आंबेडकर नगर १ येथे पाणी पुरवठा करण्यासाठी ९ लाख, नागडे आंबेडकर नगर, आण्णाभाऊ साठे नगर येथील रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रत्येकी ७ लाख, सुरेगाव रस्ता डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ७ लाख, खिर्डीसाठे गौतम नगर येथे पाण्याची टाकी बांधण्यासाठी ९९ हजार, आंबेडकर नगर येथे पाईपलाईन टाकणे व पाण्याची टाकी बांधण्यासाठी प्रत्येकी ७ लाख, विहीर खोलीकरण व बांधकाम करण्यासाठी ५ लाख, भारम आंबेडकर नगर येथे पाईप लाईन, रमाई नगर येथे पाईप लाईन टाकण्यासाठी प्रत्येकी ५ लाख, गौतमनगर येथे पाईपलाईन टाकण्यासाठी ७ लाख भाटगाव पैकी धानोरे येथील आण्णाभाऊ साठे नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण व भूमिगत गटार करण्यासाठी प्रत्येकी ७ लाख असे एकूण ३ कोटी ७० लाख ७८ हजार रुपयांची विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहे.
त्याचबरोबर निफाड तालुक्यातील शिरवाडे वाकद येथील आंबेडकर नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ९ लाख, वाकद आंबेडकर नगर येथे भूमिगत गटार करण्यासाठी ६ लाख ५० हजार, तर रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ५ लाख ५० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. गोंदेगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे पाण्याची टाकी बांधण्यासाठी ८ लाख, लासलगाव गणेशनगर येथील रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी १० लाख, संजय नगर येथे भूमिगत गटार करण्यासाठी ८ लाख, स्मशानभूमी लगत वस्तीत भूमिगत गटार करण्यासाठी ४ लाख ५० हजार, स्वरगंगानगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ७ लाख, वनसगाव येथील आंबेडकर नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ८ लाख, धारणगाव वीर येथील सोनवणे वस्ती व जुने समाजमंदिर वस्ती येथे भूमिगत गटार करण्यासाठी प्रत्येकी ७ लाख, विंचूर सिद्धार्थ नगर येथे भूमिगत गटार, अण्णाभाऊ साठे नगर येथे पोहोच रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रत्येकी ७ लाख तर संत रोहिदास नगर येथे एलईडी स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी ५ लाख असे एकूण ९९ लाख ५० हजार रुपये निधीची विकास कामे मंजूर करण्यात आली असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.


