*एन्झोकेम विद्यालयात शिक्षक दिन साजरा*
येवला - येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालय व शेठ गंगाराम छबीलदास उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रास्तविक विद्यालयाचे प्राचार्य अनिल शेलार यांनी केले. संस्थेचे सरचिटणीस सुशील गुजराथी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
![]() |
| सरस्वती नागपुरे यांचा आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मान करताना संस्थेचे सरचिटणीस सुशील गुजराथी, दत्ता महाले, अनिल शेलार, कैलास धनवटे, दत्तकुमार उटवाळे |
संस्थेचे प्रशासनाधिकारी दत्तकुमार महाले यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेतर्फे शिक्षकदिनी दिल्या जाणाऱ्या आदर्श कर्मचारी पुरस्काराबद्दल माहिती देत यावर्षीच्या पुरस्कार्थीच्या नावे जाहीर केली. विद्यालयातील उच्च माध्यमिक विभागातील कैलास पाटील यांचा आदर्श शिक्षक म्हणून, माध्यमिक विभागाच्या सरस्वती नागपूरे यांचा गुणवंत व आदर्श शिक्षिका म्हणून तर मारुती माळी यांचा मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षकेतर कर्मचारी म्हणून मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व गौरवपत्र प्रदान पुरस्कार्थींचा सन्मान करण्यात आला.
![]() |
| उच्च माध्यमिक विभागातील प्रा. कैलास पाटील यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करताना संस्थेचे सरचिटणीस सुशील गुजराथी, दत्ता महाले, अनिल शेलार, कैलास धनवटे, दत्तकुमार उटवाळे |
गौरवपत्राचे वाचन दत्ता महाले, सुहासिनी शिंदे व विशाल कळमकर यांनी केले. विद्यार्थी प्राचार्य स्वरित शिंदे, उपप्राचार्य साई मंडाळकर, पर्यवेक्षिका कृष्णाली बनकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षकांपैकी पर्यवेक्षक बापू कुलकर्णी, रामेश्वरी शिंदे, सचिन बोढरे यांनी तर विद्यार्थ्यांपैकी पूजा गाडेकर, शुभम पुणे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुशील गुजराथी यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या विद्यार्थी व शिक्षकांसाठीच्या आदर्श उपक्रमांबद्दल माहिती दिली. तसेच विद्यार्थीहिताच्या भविष्यातील योजनांची माहिती सांगितली.
याप्रसंगी विद्यार्थीशिक्षकांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा व सर्व गुरुजनांचा सत्कार केला. त्याचे सूत्रसंचालन स्नेहल सजन व साक्षी सोनवणे या विद्यार्थीनींनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन डॉ. सुहासिनी शिंदे व संदीप जेजुरकर यांनी केले तर आभार विशाल कळमकर यांनी मानले. कार्यक्रमास उपप्राचार्य कैलास धनवटे, पर्यवेक्षक बापू कुलकर्णी, माजी प्राचार्य दत्तकुमार उटवाळे, वीणा पराते, आसावरी जोशी, समर्थ क्लासेसचे संचालक व कर्मचारीवृंद व विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




