येवला तालुक्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – सरसकट नुकसान भरपाई ची मागणी
NDRF निकषा च्या 5 पट नुकसान भरपाई द्या.
- भागवतराव सोनवणे यांची मागणी
येवला तालुक्यातील रहाडी, भारम, कोळम खुर्द-बुद्रुक, वाघाळे, डोंगरगाव, आड सुरेगाव, देवठाण तळवाडे, कौटखेडे, देवठाण गारखेडे, पिंपळखुटे खुर्द-बुद्रुक आणि पूर्व भागातील सर्वच गावातील शेतकरी अतिवृष्टीमुळे गंभीर आर्थिक संकटात आले आहेत.
22 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, विशेषतः कांद्याच्या रोपांचे, पोळ व रांगड्या पिकांचे तसेच सोयाबीन, मका, कपाशी यामध्ये पाणी साचून प्रचंड नुकसान झाले आहे. ‘जलहक्क संघर्ष समिती’ आणि ‘शेतकरी कर्ज मुक्ती अभियान’च्या संयोजक भागवतराव सोनवणे यांनी याबाबत माननीय मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन पाठवले आहे.
प्रमुख मागण्या अशा आहेत
1. या भागात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा
2. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरीत सरसकट पंचनामे करावेत
3. कुठलीही अट न लावता नुकसान भरपाई दिली जावी,
4. राष्ट्रीय आपत्ती निकषा पेक्षा 5 जास्त नुकसान भरपाई द्यावी.
5. पावसाचे नुकसान असल्याने तातडीने पाहणी आणि अहवाल करणे गरजेचे आहे,
शेतातील पाणी बाहेर पडल्या नंतर अनेक शेतकरी अटी शर्ती मुळे नुकसान भरपाई पासून वंचित राहू शकतात. जास्तीत जास्त मदत, नुकसान भरपाई मिळावी
"शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानी चे फोटो व्हिडीओ जिओ टॅग करुन काढावे- तलाठी, कृषी अधिकारी यांच्या संपर्कात राहून पाहणी करुन घ्यावी."
भागवतराव सोनवणे
संयोजक, जलहक्क संघर्ष समिती