येवला नगरपरिषदेतर्फे "स्वच्छता ही सेवा पंधरवाडा" निमित्त चित्रकला स्पर्धा
येवला : येवला नगरपरिषद व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता ही सेवा पंधरवाडा उपक्रमाअंतर्गत आज शहरातील ईकरा मदरसा स्कूल येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धेला नगरपरिषदेचे अधिकारी, चंद्रकांत भोये उपमुख्यधिकारी स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे शहर समन्वयक गौरव चुंबळे नीतीन आहेर प्रकल्प अधिकारी संदिप बोढरे शितल शेळके लखन बाकले ब्रँड अंबेसिडर श्रीकांत खंदारे ईकरा स्कूल चे संस्थापक अझर शहा मुझुंमंदिन चौधरी शिक्षकवृंद तसेच पालक उपस्थित होते. विजेत्या विद्यार्थ्यांना लवकरच पारितोषिके प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आली.स्वच्छता हीच सेवा, स्वच्छ शहर हेच आपले ध्येय हा संदेश या स्पर्धेतून अधोरेखित करण्यात आला.
दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025 या कालावधी त स्वच्छता पंधरवडा राबवण्यात येत असून या कालावधीत शहरातील मुख्य ठिकाणी तसेच कॉलनी परिसर स्वच्छता म्हणून राबविण्यात येत आहे तरी नागरिकांनी या स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे.
श्री तुषार आहेर
मुख्याधिकारी
येवला नगरपरिषद येवला