*प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्याकडून येवला तालुक्यातील अतिवृष्टी बाधित क्षेत्राची पाहणी*
येवला :
येवला तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने पंचनामे करण्याची आदेश दिले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी आज अतिवृष्टी भागाची पाहणी केली.
येवला तालुक्यातील आडसुरेगाव येथील बंधारा अतिवृष्टीमुळे भरलेला आहे. या बंधाऱ्याला काही लिकेज असल्याने गावाला धोका निर्माण झालेला होता. या पार्श्वभूमीवर प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी या परिसराची पाहणी करत या बंधाऱ्याच्या बाजूने तातडीने सांडवा काढून पाणी मार्गस्थ करण्यात आले. त्यामुळे या परिसरातील पुराचा धोका टळला आहे.यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, कृषी अधिकारी शुभम बेरड, मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, अशोक गालफाडे, तालुका पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम, सुनील पैठणकर, सचिन कळमकर, नितीन गायकवाड, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, दीपक गायकवाड, गोटू मांजरे, सुमित थोरात, सचिन सोनवणे, योगेश खैरनार, भगवान ठोंबरे, श्रीकांत वाघचौरे, पार्थ कासार, प्रकाश बागल, गणेश गवळी यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.