मंडळ स्तरावर सुनावणी घेऊन तातडीने शेत रस्त्याचा वाद मिटवला

 मंडळ स्तरावर सुनावणी घेऊन तातडीने शेत रस्त्याचा वाद मिटवला


महसूल सेवा पंधरवडा निमित्ताने शेत रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात वादांकित रस्त्यांबाबत यादी करण्यात आली. त्यानुसार अंगणगाव मंडळ कार्यालय येथे दाखल अर्ज नुसार मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 चे कलम 5(2) अन्वये वादी व प्रतिवादी यांची मंडळ अधिकारी कार्यालय अंगणगाव या ठिकाणी सुनावणी घेण्यात आली. मंडळ स्तरावर सदर सुनावणी मध्ये सदरचा वादांकित रस्ता बाबतचा वादी व प्रतिवादी यांना विश्वासात घेऊन शेतकरी यांचा समझोता करण्यात आला. सदर रस्ता खुला करणे कामी लगतचे सर्व शेतकरी यांनी आप आपसात समझोत नामा लिहून दिल्याने सदर रस्ता वाद मिटल्याचे वादी व प्रतिवादी यांनी जाहीर केले. सदर वेळी मा. तहसीदार श्री.आबा महाजन साहेब, मा. नामदार भुजबळ साहेब यांचे स्विय्य सहाय्यक लोखंडे साहेब, येवला विधानसभा मतदार संघ प्रमुख श्री. वसंतराव पवार, मंडळ अधिकारी अंगणगाव एन.बी.गायके,तलाठी हेमंत निंबाळकर, अनिल बावस्कर व शेतकरी उपस्थित होते.

-----

" महसूल सेवा पंधरवडा निमित्ताने आज मंडळ स्तरावर वादांकित शेत रस्त्यांबाबत सुनावणी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये संबंधित शेतकरी यांनी आपसात समझोता करून शेत रस्ता खुला करण्याबाबत लेखी समजुतनामा दिल्याने वाद तात्काळ मिटवण्यात यश प्राप्त झाले आहे. यामुळे अंगणगाव व पारेगाव यामधील वादांकित रस्त्याचा वाद  मिटल्याने समाधान व्यक्त केले जात आहे"

– आबा महाजन तहसीलदार येवला



टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने