*विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच भावनिकदृष्ट्या सक्षम व्हावे: नायब तहसीलदार पंकज नेवसे*
येवला दि. 16 विद्यार्थ्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी शिक्षण व संस्कार महत्त्वाचे असतातच, त्याबरोबरच त्यांनी भावनिकदृष्ट्या सक्षम व कणखर होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन येवला तहसीलचे नायब तहसीलदार पंकजजी नेवसे यांनी केले. येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालयात नुकतीच शिक्षक-पालक संघाची स्थापना करण्यात आली, त्याप्रसंगी ते बोलत होते. परिस्थितीची कारणे न सांगता आहे त्या परिस्थितीत कठोर मेहनत घेतल्यास यश मिळतेच, त्यामुळं पाल्यांना मेहनत घ्यायला सांगण्याचे आवाहनही त्यांनी पुढे केले.
कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सरचिटणीस सुशील गुजराथी, उपाध्यक्ष डॉ. मनिष गुजराथी, संचालक रोशन भंडारी, संजय कुक्कर, प्रशासकीय अधिकारी दत्ता महाले, विद्यालयाचे प्राचार्य अनिल शेलार, उपप्राचार्य कैलास धनवटे, गेनू पिसाळ यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून झाली. विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी स्वागतगीतातून उपस्थित पालकांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अनिल शेलार यांनी केले. पालकांतर्फे दीपक भावसार, राजू गायकवाड, बापू वाळुंज, अंकुश शिंदे, जयश्री शिंदे, गोरख खैरनार, ज्योती खंडारे, मंजिरी खैरे, सोनाली बोरनारे, मनीषा शिंदे, निलेश पटेल, अनिल झाल्टे, राजेश तांबे, मानसी काळंगे, रमाकांत वारुळे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यालयाच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले, तसेच काही बाबींकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी शालेय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. पालकांच्या मागण्या व शंकांचे प्रशासकीय अधिकारी दत्ता महाले यांनी निरसन केले व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल.
याप्रसंगी 2025- 26 या शैक्षणिक वर्षासाठी नवीन शिक्षक-पालक संघ कार्यकारिणी निवडण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून भालचंद्र कुक्कर यांची तर , विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून पंकज नेवसे (नायब तहसीलदार, येवला) यांची, तसेच बापू वाळुंज, हिरामण पगार, निंबादास पैठणकर, रंजना जानकर, राजेश तांबे, संजय वाबळे, मनिषा शिंदे, विकास बोरनारे, अंकुश गाडेकर, कुशल पटेल, गेनु पिसाळ, दिगंबर यादव, प्रतिभा खैरे, गोरख खैरनार, ज्योती खंडारे, किरण गायकवाड, पुष्पा गायकवाड, कमलाकर तरकस यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित उपाध्यक्ष व सदस्यांचा संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सुशील गुजराथी यांनी पालकांना त्यांचा अडचणी, मागण्या स्पष्टपणे मांडण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक-पालक संघ विभागप्रमुख सरस्वती नागपुरे, उत्सवप्रमुख सुहासिनी शिंदे, उपप्राचार्य कैलास धनवटे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन सरस्वती नागपुरे यांनी केले तर आभार प्रेरणा जोशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीणा पराते, आसावरी जोशी, सारिका चौधरी, सुरेखा गिरासे, पौर्णिमा खैरनार, वैशाली पाटणकर, रामेश्वरी शिंदे, प्रकाश सोनवणे, सतिश विसपुते, योगिता विसपुते, रमेश माळी, सविता महाले, मयुरी कासार व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.