येवला तालुक्यात जोरदार पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान, पण सोंगनीला आलेल्या बसणार सोयाबीनला फटका..
येवला :
येवला शहर आणि परिसरात गेले अनेक दिवस प्रतीक्षा असलेल्या पावसाने आज, सोमवारी (१५ सप्टेंबर) सायंकाळी ६:१५ च्या सुमारास जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, कारण खरीप पिकांसाठी हा पाऊस महत्त्वाचा मानला जातो.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. आजच्या जोरदार पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे या पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
सोंगनीला आलेल्या सोयाबीनच्या शेंगांमध्ये पाणी साचून दाणे काळे पडू शकतात, ज्यामुळे उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे एका बाजूला पावसाच्या आगमनाने समाधान असले तरी, दुसऱ्या बाजूला सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.