*येवला अमरधाम येथे स्वच्छता पंधरवडा निमित्ताने स्वच्छता मोहीम*

 येवला अमरधाम येथे स्वच्छता पंधरवडा निमित्ताने स्वच्छता मोहीम


 – स्वच्छ भारत अभियान अंतर्गत येवला नगरपरिषद तर्फे सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा 2025 अभियान निमित्ताने आज अमरधाम परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत नगरपरिषद कर्मचारी, स्वच्छता दूत, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. अमरधाम परिसरातील कचरा साफसफाई, नाल्यांची स्वच्छता तसेच निर्जंतुकीकरण यांसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली.


मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी या प्रसंगी नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. "सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे ही सामाजिक जबाबदारी असून ही कोणा एकाची जबाबदारी नाही म्हणून सर्व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले.


स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या नागरिकांनी नगरपरिषदेस सहकार्य करून  परिसर स्वच्छतेस हातभार लावला. या उपक्रमामुळे अमरधाम परिसर स्वच्छ व सुशोभित झाला असून नागरिकांनी नगरपरिषदेच्या या कार्याचे स्वागत केले.


याप्रसंगी स्वच्छता मोहिमेस उपस्थित एस एन डी कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी, मृत्युंजय मंदिरातील भाविक येवला नगरपरिषदेचे उपमुख्यधिकारी चंद्रकांत भोये, भांडारपाल प्रमुख किरण अहिरे, प्रधानमंत्री आवास योजना अभियंता नितीन आहेर स्वच्छता निरीक्षक पुनम भामरे शहर समन्वयक गौरव चुंबळे, प्रकल्प अधिकारी संदीप बोढारे शितल झावरे स्वच्छता मुकादम गोपी जावळे नितीन लोणारी व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने